kolhapur jotiba and mahalaxmi temple paintings done by mr. anil adhik till 25 years in kolhapur 
कोल्हापूर

25 वर्षांपासुन श्री. अंबाबाई, जोतिबा मंदिराची शिखरे चमकवणार अवलिया

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : नवरात्र उत्सवामध्ये करवीर निवासनी श्री. अंबाबाई मंदिराला व चैत्र  यात्रेत जोतिबा मंदिराला देखणे रूप यावे यासाठी या मंदिरांच्या शिखरांची दरवर्षी  रंगरंगोटी केली जाते. गेल्या पंचवीस वर्षापासून दोन्ही मंदिर शिखरांची रंगरंगोटी कोल्हापूरातील रमणमळा येथील अनिल हिंदूराव अधिक हे करतात. देवाची सेवा म्हणून अगदीच अल्प दरात ते शिखरांना सजवायचे काम करतात. 


जोतिबाची मंदिराची शिखरे ही दगडी बांधकामातील उंच आहेत. काम पंधरा दिवस आधीच शिखरांच्या रंगरंगोटीचे काम सुरु झालेले असते. केवळ एका हाताने दोरीला धरून हे काम करावे लागते. जोतिबा मंदिराचे शिखराचे रंगकाम पूर्ण व्हायला पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. जोतिबाचे खेटे सुरु झाले की या शिखरांच्या रंगरंगोटीची कामाला प्रारंभ होतो. सुरुवातीला सर्व शिखरे घासून पूर्वीच्या रंगाचे पोपडे  काढावे लागतात. त्यानंतर शिखरे स्वच्छ करून त्यावर प्रायमरचा हात मारून घेतला जातो. दहा वर्षापूर्वी शिखरांना पांढरा चुना, पिवडी मिक्स करून रंग दिला जायचा. आता मात्र मुख्य पिवळसर आणि भगवा रंग या शिखरांना दिला जातो. कालांतराने बाजारात वेगवेगळे रंग उपलब्ध झाले आणि या शिखरांना ऑईल पेंट कलर देण्यास सुरूवात झाली.  

सामान्य कुटुंबातील अधिक यांनी वडिलांकडून ही पेंटींगची कला अवगत करुन घेतली. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय सुरु आहे. दरम्यान, सुरूवातीला नवरात्र उत्सवात त्यांनी कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिराची शिखरे रंगविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जोतिबा मंदिर शिखरे रंगविण्याचे काम सुरू केले. रंगकाम करताना संरक्षन म्हणून व्ही बेल्ट वापरतात. कडक उन्हात काम करताना पायाला फोड येतात, मात्र आवडीचे काम आणि देवावर असणारी भक्तीमुळे चांगभलचा जयघोष करीत कामात ते मग्न असतात.

"अंबाबाई व जोतिबा मंदिराची शिखरे रंगवायची सेवा आमच्या हातून दरवर्षी घडते. सेवा म्हणून आम्ही हे काम करतो. या सेवेमुळे मला  समाधान मिळते. आमच्या या सेवेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत." 

- अनिल अधिक, न्यू पॅलेस रमणमळा, कोल्हापूर 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT