kolhapur kabnur deputy sarpanch 
कोल्हापूर

उपसरपंचच खुर्चीत बसण्यास नकार देतात तेंव्हा... 

रवींद्र पाटील

कबनूर (कोल्हापूर) - तिळवणी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. पण जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कारभाराचे विशेष लेखापरीक्षण केल्याशिवाय खुर्चीत बसणार नाही अशी नवीन उपसरपंचांनी प्रतिज्ञा घेतल्याने सारे अवाक झाले. 

ताराराणी सुराज्य आघाडीने सत्तांतर घडवले. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र वसगडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंचपदी राजेश बाबासाहेब पाटील तर उपसरपंचपदी दीपक दिलीप गायकवाड यांची बहुमताने निवड झाली.

निवडीनंतर वसगडेकर यांनी उपसरपंच गायकवाड यांना उपसरपंचांच्या खुर्चीत बसण्यास सांगितले. तथापि गायकवाड यांनी उपसरपंचांच्या खुर्चीत बसण्यास नकार दिला. वीस वर्षांत ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार व त्याची चौकशी सुरू असून जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कारभाराचे विशेष लेखापरीक्षण केल्याशिवाय मी खुर्चीत बसणार नाही, अशी प्रतिज्ञा केली असल्याचे सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT