kolhapur kagal education society 
कोल्हापूर

शिक्षकांच्या दातृत्वातून जमा झाले तब्बल बारा लाख रूपये

रमजान कराडे

नानीबाई चिखली  - कागल तालुक्यातील शिक्षण विभागाने बालसाहित्य संमेलन, बालवैज्ञानिक पुस्तिका, ऑनलाईन शाळा, डिजिटल वर्ग सारखे राबविलेले उपक्रम शिक्षणप्रेमींच्या पसंतीस पडले आहेत. यामध्ये आणखी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची भर पडली असून त्यास अफाट प्रतिसाद मिळाला आहे. तो म्हणजे 'शिष्यवृत्ती गंगाजळी.' या उपक्रमांतर्गत गेल्या 45 दिवसांमध्ये तालुक्यातील शिक्षकांच्या दातृत्वातून तब्बल बारा लाख 1 हजार रुपयांचा निधी जमा झालेला आहे.

 केवळ जिल्ह्यातच नव्हे राज्यात अशा प्रकारचा राबविलेला हा अभिनव उपक्रम असून त्यास मदतीचा ओघ सुरूच आहे. 

कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला हा उपक्रम. जिल्हा परिषदेच्या शाळेत येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अशैक्षणिक कामाचा बोजा असतानाही शिक्षक प्रामाणिक करतात. शिक्षकांच्या याच प्रामाणिक प्रयत्नांना गेल्या कांही वर्षात यश येत असल्याने येथील पटसंख्या वाढिबरोबरच गुणवत्ता देखील वाढलेली आहे. आज याचाच परिणाम म्हणून गेली तीन वर्षे पाचवी शिष्यवृत्तीमध्ये कागल तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. 

याचबरोबर नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये देखील येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य स्तरावर घवघवीत यश मिळविले आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना, मार्गदर्शक शिक्षकांना प्रेरणा मिळावी, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी तालुकास्तरावर त्यांचे सत्कार घडवून आणले जातत. मात्र सत्कारासाठी मिळणारा निधी तोकडा असल्याने शिक्षण विभागाला प्रत्येक वर्षी समाजातील डोनर शोधावे लागतात. कार्यक्रमांना डोनर मिळतात देखील. मात्र बहुतांश वेळा ते वैयक्तिक स्वरूपाचे कार्यक्रम होतात. या सर्वच गोष्टींचा विचार करीत गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांनी 'शिष्यवृत्ती गंगाजळी'ची संकल्पना शिक्षकांसमोर मांडली. एकदाच देणगी देण्याची कल्पना सर्वांना आवडल्याने तात्काळ गटशिक्षणाधिकारी व दोन शिष्यवृत्ती शिक्षकांच्या नावे राष्ट्रीय बँकेत खाते उघडले.

 खात्यावर सर्वप्रथम डॉ.कमळकर, विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे यांनी अनुक्रमे दहा हजार, पाच हजार रुपयांची देणगी दिली. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षणप्रेमी आदींनी भरभरून प्रतिसाद दिल्याने 45 दिवसातच तब्बल बारा लाख एक हजार रुपयांची देणगी जमा झाली. कायमस्वरूपी जमा गंगाजळी रकमेच्या व्याजातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचा दर्जेदारपणे सत्कार केला जाणार आहे. 

पारदर्शकता जपली जाणार
दरम्यान शिक्षणाधिकारी यांची बदली झाली तरी जॉईंट खात्यामुळे त्या पदावर येणारा अधिकारी गुणगौरव समारंभ पुढे चालू ठेवणार असून पिढ्यानपिढ्या सत्काराचे कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. याचबरोबर प्रत्येक वर्षीचा जमाखर्चाचा संपूर्ण तपशील तालुक्यातील शिक्षकांना देत यामध्ये पारदर्शकता जपली जाणार आहे.

कागल तालूक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत यश मिळविले आहे. अशा विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शक शिक्षकांना ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी केला जाणारा सत्कार अपुऱ्या निधीमुळे मनासारखा होत नव्हता. आता शिष्यवृत्ती गंगाजळीच्या माध्यमातून त्यांचा दर्जेदार सत्कार केला जाणार. 
  - डॉ. गणपती कमळकर, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कागल


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT