kolhapur Kalamba prison administration alert 
कोल्हापूर

कोल्हापूर ; कळंबा कारागृह प्रशासन सतर्क 

राजेश मोरे

कोल्हापूर - टेनिसबॉलमधून कळंबा कारागृहात गांजा पोहचविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर कारागृह प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. गांजा ज्याच्या पर्यंत पोहचविण्यात येणार होता. त्याचे नाव पुढे आले असून त्याच्याकडे प्रशासन चौकशी करत आहे. 

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तरेकडील बाजूने कारागृहात गांजा पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अमित पायगुडे, वैभव कोठारी, संदेश देशमुख असे हे तिघे पुण्यातील आहेत. कारागृहात मित्राच्या भावासाठी गांजा पोहचविण्याच्या ते तिघे तयारीत होते. त्यासाठी त्यांनी टेनिसबॉलचे चेंडू कापून त्यात गांजा भरला होता. त्यानंतर ते बॉल चिकटपट्टीच्या सहायाने चिकटवले होते. क्रिकेट खेळत असल्याचे भासवून बॉलिंग करण्याच्या बहाण्याने ते हे चेंडू कारागृहात फेकण्याच्या तयारीत होते. अशी माहिती पुढे आली. त्यानुसार तातडीने कारागृहातील सर्व सीसी टीव्ही तपासण्यात आले. ज्या मित्राच्या भावासाठी तिघा संशयितांचा प्रताप सुरू होता. त्या बंदीकडेही चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर कारागृहातील संपूर्ण परिसराची पहाणी करण्यात आली. त्यात अशा पद्धतीचा बॉल कोठे पडला आहे का? हे पाहण्यात आले. पण तशी कोणतीही गोष्ट मिळून आली नाही. तरीही संपूर्ण यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. 


कारागृहाचा परिसर मोठा आहे. कारागृहात येणारे गांजा भरलेले टेनिसबॉल सफाई करणाऱ्या एखाद्या बंदीला हाताशी धरून प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाणार होता का? याबाबतचीही चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: नोकरीचं स्वप्न भंगलं? सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतलं म्हणून...; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल केला रद्द

Marriage Problems: विवाहासाठी योग्य स्थळे का सांगून येत नाहीत? वाचा सविस्तर

Daily Rashi Bhavishya: भाग्य, यश आणि आशीर्वाद! 'या' राशींच्या लोकांनावर असेल शनिदेवाची कृपादृष्टी, वाचा आजच राशीभविष्य

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT