kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur : कोविड बॅच, विद्यार्थ्यांचे 'बॅडपॅच': कोरोनाचा झटका, नोकरीला फटका !

काही कंपन्यांनी तर ‘कोविड बॅच नॉट अलाऊड’ अशी जाहिरात देत नव्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. ‘डिग्री आहे; पण नोकरी नाही’ अशी अवस्था कोविड बॅचची आहे.

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर -चार वर्षांपूर्वी जगभरात कोविडचे संकट आले. सर्व काही ठप्प झाले. याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसला. वर्ग नियमित नाहीत. परीक्षाही सोप्या पद्धतीने घेतल्याने विद्यार्थ्यांची क्षमता विकसित झाली नाही, असा विचार समाजमनात रुजला. पुढे त्यांना नोकऱ्या मिळविण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत.

खासगी क्षेत्रासोबतच सरकारी क्षेत्रातही कोविड १९ बॅचच्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी उत्साह दिसत नाही. पदवीधर २०१९ ते २०२१ या वर्षातील असेल तर थेट परतीचा मार्ग दाखवला जातो. या बॅचला येणारे अनुभव आजपासून...

कोविड आला, शाळा-महाविद्यालयांचे फाटक बंद झाले. थोड्या कालावधीनंतर वर्गात चालणारे अध्यापन ऑनलाईन वर्गात सुरू झाले. याला जुळवून घेण्यात विद्यार्थी - शिक्षकांचा कस लागला. दोन वर्षांच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात ऑनलाईन झाल्या. यामुळे समाजात, मार्केटमध्ये कोविड बॅचची नकारात्मक चर्चा होऊ लागली.

काही कंपन्यांनी तर ‘कोविड बॅच नॉट अलाऊड’ अशी जाहिरात देत नव्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. ‘डिग्री आहे; पण नोकरी नाही’ अशी अवस्था कोविड बॅचची आहे.

लाखो विद्यार्थ्यांनी कोविडमध्ये विविध क्षेत्रातील पदव्या मिळवल्या. ऑनलाईन लेक्चरद्वारे अभ्यासक्रम शिकवला.

त्यावेळी त्यांचे ‘प्रॅक्टिकल’ झाले नाही. यामुळे नोकऱ्यांसाठी लागणारी पात्रता विद्यार्थ्यांनी मिळवली नाही, अशी चर्चा होऊ लागली. परिणामी, या विद्यार्थांना नोकरीत घेण्यासाठी कंपन्या नकार देऊ लागल्या. याचा धडा घेत काही विद्यार्थ्यांनी कोविडनंतर विविध प्रॅक्टिकल ज्ञान देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले.

यामुळे त्यांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र, शैक्षणिक शुल्क व इतर खर्चातून आलेला आर्थिक ताण, कोविडमध्ये कमी झालेले आर्थिक उत्पन्न यामुळे सर्वांनाच अशा प्रकारचे शिक्षण नव्याने घेणे शक्य नव्हते. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी कोविड बॅचचा शिक्का घेऊन नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत.

महापुरामुळे आमच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. तोवर कोविडचे संकट आले. त्यामुळे पुढील सहा महिने काहीच झाले नाही. त्यानंतर ऑनलाईन वर्ग सुरू झाले. प्रॅक्टिकल झाले नाही. यामुळे आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी जास्तच प्रयत्न करावे लागत आहेत. हे पाहता काही शैक्षणिक संस्थांनी नवे अभ्यासक्रम सुरू करून कोविडमध्ये झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

- अस्मिता चौगुले, विद्यार्थिनी, एम.ए. मानसशास्त्र

कंपन्यांनी कोविड बॅचचे विद्यार्थी घेणार नाही, अशी जाहिरात करणे चुकीचे आहे. या विद्यार्थ्यांना संधी देऊन सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल करून घ्यावे व थोडेफार मानधन द्यावे. जेणेकरून हे विद्यार्थी नोकरीच्या प्रवाहात येतील.

- डॉ. कालिंदी रानभरे, समुपदेशक

प्रशिक्षणार्थी म्हणून संधी देण्याची मागणी

कोविड बॅच हा शिक्का पुसून घेण्यासाठी हे विद्यार्थी तयार आहेत. कंपन्यांनी सुरुवातीला ‘प्रशिक्षणार्थी’ म्हणून जरी संधी दिली तरी हे विद्यार्थी काम करण्यासाठी तयारी दर्शवत आहेत. अशावेळी कंपन्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून नोकरी देण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT