जुन्या पुलांचे ऑडिट  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जमीन संपादनाचा प्रश्‍न अन् रखडलेले काम!

पूल बांधताना त्याकरिता आवश्यक जमिनीच्या संपादनाचा प्रश्‍न वारंवार उपस्थित होतो.

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जुन्या पुलांचे ऑडिट झाल्यानंतर त्यांच्या पुनर्बांधणीचे काम नक्की किती दिवसांत होणार, याचा अंदाज नागरिकांना येत नाही. त्यामुळे महापुरात होणाऱ्या त्रासाला पूर्णविराम कधी मिळेल, हे समजत नाही. पूल बांधताना त्याकरिता आवश्यक जमिनीच्या संपादनाचा प्रश्‍न वारंवार उपस्थित होतो. त्यावर तत्काळ तोडगा निघतोच असे नाही आणि त्यातूनच ऑडिट होऊनही बांधकामाचे काम रखडले जाते.

केंद्रातील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी रस्त्यांच्या विकासासाठी निधीची घोषणा करत आहेत. जिल्ह्यातील अरुंद रस्त्यांच्या विकासासाठी निधी घोषित झाला आहे. तो करताना त्या रस्त्यावर येणाऱ्या पुलांचा विचार जरुर केला जातो. पुलाची उंची वाढताना व रस्त्याचे रुंदीकरण करताना आवश्यक जमिनींचे संपादन सहजासहजी होत नसल्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याला अनुभव येतो. त्याचबरोबर पुलाच्या कामात दिरंगाई झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. छत्रपती शिवाजी पुलाचे रखडलेले बांधकाम त्याचे उदाहरण.

याचा विचार करता ऑडिट झाले आहे त्या पुलांचे काम वेळेत व्हावे, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर छोट्या पुलांच्या दुरुस्तीसह उंची वाढविण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत शाहूवाडी तालुक्यातील विकास जाडगे म्हणाला, ‘पावसाची एखादी सर जरी आली तरी ओढे-नाले तुडुंब भरतात. मुख्य वाड्या वस्त्यांवरील लोकांना शेजारच्या गावात जाता येत नाही.

पावसाळ्यात तर शालेय विद्यार्थ्यांचे हाल होतात. गावात चौथीपर्यंत त्यांना शिकता येते. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी चार-पाच किलोमीटर चालत जाऊन शेजारच्या गावात शाळेला जावे लागते. पावसाळ्यात नाल्यातील पुरांमुळे त्यांना शाळेला जाता येत नाही.’

मोठ्या पुलांबरोबर गावांना जोडणाऱ्या छोट्या पुलांची उंची वाढविण्याचा प्राधान्याने विचार करावा. मोठ्या पुलांची उंची वाढवताना जमिनीच्या संपादनाचा प्रश्‍न चर्चेत येतो. शासनाने गावांना जोडणाऱ्या छोट्या पुलांकडेही लक्ष द्यावे.

- बाबूराव झोरे, चंदगड तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT