जमीन तुकडेबंदी गरिबांच्या मुळावर sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जमीन तुकडेबंदी गरिबांच्या मुळावर

खरेदी-विक्रीची अडचण; शिक्षण, घराचे स्वप्न बारगळले; कायद्यात सुधारणा गरजेची

सुनील पाटील

कोल्हापूर : तीन-चार गुंठे शेती किंवा प्लॉट तारणावर मुलांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक कर्ज मिळत नाही. तीच शेती किंवा प्लॉट विकायचे म्हटले तर तुकडेबंदी कायद्यामुळे २० गुंठ्यांखालील जमिनीची विक्री करता येत नाही. त्यामुळे अनेक पालकांना पाल्यांना उच्च शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण कसे द्यायचे, हा प्रश्‍न पडला आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांना आपल्या स्वप्नातील घर बांधायचे आहे त्यांनाही एक-दोन गुंठे जागा खरेदी करता येण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे या कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

जमिनीच्या तुकड्यांमुळे शेती व्यवसाय तोट्यात आहे. शेती विकासाला खीळ बसत आहे. शेती विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेती उत्पादनात सुधारणा करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेवून तुकडेबंदी कायदा अंमलात आणण्यात आला. या वेळी त्याचे स्वागतही झाले. आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी अनेकांना बॅंकांकडून कर्ज मिळत नाही. जे तारण द्यायचे आहे, ते पुरेसे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे दोन-तीन गुंठे जमीन आहे तिची विक्री करावी म्हटले तर तुकडेबंदी कायद्यामुळे ती करता येत नाही. अशा अल्पभूधारकांकडून आता आपल्या जमिनीचा तुकडा विकायचा कसा? असा सवाल केला जात आहे.

पैशासाठी किंवा मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी याशिवाय दुसरा पर्याय नसलेल्या पालकांना तुटपुंज्या जमिनीच्या तुकड्याचीही विक्री करता येईनाशी झाली आहे. याला कायद्याने खो घातल्याने जमीन खरेदी-विक्री करता येत नाही. जमीन विक्रीसाठी जरियात १ ते ४ गुंठ्यांचा तुकडा, भात जमीन असेल तर १ गुंठा ते १ एकर जमीन, बागायत जमीन असेल तर ५ गुंठे ते १ एकर व वरकस जमीन असेल तर २ गुंठे ते ५ एकर जमिनीचा एक तुकडा मानला जात आहे. हा कायदा पूर्वी मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास मुंबई प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ असे नाव होते. महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये याचे नाव बदलून महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ असे नाव ठेवले आहे.

गोरगरिबांना अर्धा-एक किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करून घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे अशा लोकांनाही जमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना खीळ बसली आहे. एकीकडे अर्धा गुंठे जमीन घेण्याची ताकद नाही, अशांनी आता वीस गुंठ्यांपेक्षा जास्त शेत जमीन किंवा प्लॉट कसा घ्यायचा?

तुकडेबंदीमुळे गोरगरीब शेतकऱ्यांना जमीन खरेदी-विक्री करता येत नाही. अनेकांना शिक्षणासाठी कर्ज मिळत नाही, म्हणून आपल्याकडे जी जमीन आहे त्याची विक्री करून ते मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांना मात्र तुकडेबंदीमुळे अडचण येत आहे.

-संदीप पाटील, पालक

  • तुकडेबंदीत कोणती जागा विक्री करता येते?

  • तुकड्यांचे हस्तांतरण वारसाने होत असेल तर

  • कूळ कायद्यानुसार कुळाला जमीन विक्री करता येते

  • एकाच गटातील शेतकऱ्यांना ती जमीन विक्री करता येते

  • तुकडेबंदी कायदा यासाठी लागू नाही

  • मुले किंवा प्रौढ व्यक्तींसाठी धर्मशाळा, खेळाचे मैदान, शाळा

  • कृषी विद्यापीठासाठी आवश्‍यक जमीन सहकारी गृहनिर्माण संस्था

  • रस्ते, शौचालये, स्मशानभूमी, दफनभूमी, गायरानसाठी जमीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT