प्रतिकात्मक छायाचित्र sakal
कोल्हापूर

कोल्हापूर: ‘सारथी’च्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ

मुदत वाढविण्याची वेळ : प्रतिसाद नसल्याने निर्णय

निवास चोगुले

कोल्हापूर : मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’कडे राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एकीकडे होत असताना ‘सारथी’तर्फे विविध परीक्षांसाठी मागवलेल्या अर्ज भरण्याकडे मराठा तरुणांनी पाठ फिरवली आहे. परीक्षेसाठी प्रतिसादच नसल्याने अर्ज भरण्याची मुदत महिन्यांनी वाढविण्याची वेळ आली.

‘सारथी’तर्फे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, न्यायाधीश व स्टाफ सिलेक्‍शनच्या परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या तरुणांनी विविध खासगी क्लासमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. गेल्यावर्षी याला उदंड प्रतिसाद मिळाला होता, तब्बल १५ हजार तरुणांनी अर्ज केले होते. यावेळी अर्ज करण्याची मुदत २० सप्टेंबर होती; पण निर्धारित कालावधीत ८०० तरुणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या अर्जासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘सारथी’च्या प्रशासनाने घेतला आहे.

मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवण्यासाठी ७ एप्रिल २०१८ रोजी राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना केली; पण प्रत्यक्षात संस्थेचे काम गेल्यावर्षीपासून सुरू झाले. या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी खासगी क्लासची फी, राहण्यासाठी पैसे, प्रवास खर्च आदी भत्ते दिले जातात.

मराठा, कुणबी व शेती व्यवसायाशी संबंधित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते, संस्थेकडून विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज मागवले आहेत. ‘सारथी’ला आता निधीची कमतरता नाही; पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला. या समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी.

‘सारथी’कडून काय मिळते

यूपीएससी परीक्षा : खासगी क्लासची फी, पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्याला ९ हजार, तर दिल्लीत राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला महिन्याला १३ हजार रुपये भत्ता

महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवा : खासगी क्लास फी व राहण्याचा खर्च

न्यायाधीश परीक्षा : क्लासची फी व राहण्याचा खर्च

स्टाफ सिलेक्शन : मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT