kolhapur Mangaon soldier dies in Mizoram 
कोल्हापूर

शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा

भेडसगाव, (कोल्हापूर) : माणगाव (ता. शाहूवाडी) येथील भारतीय सीमा सुरक्षा दलात सेवेतील उदयसिंह पांडुरंग पाटील (वय 43) यांचे मिझोराममधील आय झोन सेक्‍टर येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (ता. 13) हृदयविकाराने निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर माणगाव येथे अंत्यसंस्कार केले. 

उदयसिंह पाटील 1998 मध्ये देशसेवेत रुजू झाले होते. 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी बंगलोर, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्‍मीर, आसाम, त्रिपुरा येथे सेवा बजावली आहे. गत महिन्यात ते गावी आले होते. मंगळवारी मिझोराम येथील आय झोन सेक्‍टरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले. काल त्यांचे पार्थिव कोलकाताहून विमानाने मुंबईत आणले. तेथून बीएसएफच्या वाहनाने माणगाव येथे आणले. पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी, मुले, भाऊ, बहीण यांसह नातेवाईकानी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्‍टरमधून त्यांची गावातून अंत्ययात्रा काढली. शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र देशमुख, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT