पन्हाळा sakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Alert : भूस्खलनाची भीती पन्हाळ्यात काळीज चिरतेय...

२०१९ पासून सलग दोन वर्षे पन्हाळगडावर भूस्खलन होऊन रस्ता पूर्णपणे बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

देवाळे : पन्हाळा व परिसरात दमदार पाऊस सुरु आहे. याच पावसाने पन्हाळगड व मसाई पठार भोवतालच्या डोंगरउतारावरील भूस्खलन होणाऱ्या गाव, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या लोकांच्या मात्र काळजाचा ठोका चुकत आहे.

२०१९ पासून सलग दोन वर्षे पन्हाळगडावर भूस्खलन होऊन रस्ता पूर्णपणे बंद झाला. याच डोंगरमालेशी संलग्न जोतिबा डोंगर, मसाई पठार म्हाळुंगे, वेखंडवाडी, बादेवाडी, बोंगेवाडी व मराठवाडी गावांचीही हीच स्थिती झाली.

पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर, मंगळवारपेठ, आपटी, बुधवारपेठ, रविवारपेठ गावांना नेहमीच भूस्खलनाचा धोका आहे. पन्हाळा, मसाई पठार व सभोवताली प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस, बेसुमार वृक्षतोड तसेच जमिनीचे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सपाटीकरणामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत.

त्यामुळे या परिसरातील जमीन खचण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस असून नुकत्याच झालेल्या रायगड जिल्ह्यातील भूस्खलन दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. तहसीलदार माधवी शिंदे - जाधव यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासनाने पन्हाळा व मसाई पठार पायथ्याशी सतत खचणारी जमीन याबाबत भूवैज्ञानिकांमार्फत परिसराचे वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण करावे. त्याची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

- अनिल कंदूरकर, माजी सभापती पंचायत समिती, पन्हाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT