Kolhapur Market Committee Election Result esakal
कोल्हापूर

Bazar Samiti Result : कोल्हापूरच्या नेत्यांनी करुन दाखवलं; बाजार समितीत 'इतक्या' जागांवर मिळवला विजय

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Kolhapur Market Committee Election Result) सत्तारूढ महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हमाल तोलाईदार गटात अपक्ष बाबूराव खोत यांनी तर व्यापारी गटात परिवर्तन आघाडीचे नंदकुमार वळंजू यांनी बाजी मारलीये.

कोल्हापूर : राज्यातील बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. अनेक ठिकाणी संमिश्र निकाल लागले आहेत. तर, काही भागात मातब्बर नेत्यांचा बाजारच उठला आहे. दरम्यान, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Kolhapur Market Committee Election Result) सत्तारूढ महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीनं 18 पैकी 16 जागा जिंकत बाजार समितीच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.

विरोधी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलचा मोठा पराभव झाला आहे. हमाल तोलाईदार गटात अपक्ष बाबूराव खोत यांनी तर व्यापारी गटात परिवर्तन आघाडीचे नंदकुमार वळंजू यांनी बाजी मारलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT