Kolhapur : शिवाजी चौकापासून मुख्य दर्शन रांग 
कोल्हापूर

Kolhapur : शिवाजी चौकापासून मुख्य दर्शन रांग

सोशल डिस्टन्ससाठी ७०० पांढरे पट्टे; बिनखांबी गणेश मंदिरापासून मुखदर्शन रांग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवात ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांनाच दर्शन दिले जाणार आहे. पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत दर्शन खुले राहणार असून, ४ ते रात्री ९ या कालावधीत ऑनलाईन बुकिंगच्या साह्याने भाविकांना मंदिरात प्रवेश घेता येणार आहे. तासाला ६०० ते ७०० याप्रमाणे दिवसभरात किमान १० हजार भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्‍यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, बुकिंग केलेल्या भाविकांना मुख्य दर्शनासाठी शिवाजी चौकातून भवानी मंडपमार्गे दर्शन रांगेचे नियोजन केले आहे.

सोशल डिस्टन्सच्या नियमानुसार सहाफुटांवर असे ७०० पांढरे पट्टे रस्त्यावर मारले जाणार आहेत. शिवाजी चौकातच थर्मल स्कॅनिंग बूथ, चप्पल स्टॅँडची व्यवस्था केली जाणार आहे. मुख दर्शनासाठीही बिनखांबी गणेश मंदिर येथून बॅरिकेड्‌स लावून स्त्री व पुरुष अशा स्वतंत्र रांगांचे नियोजन केले आहे. महाव्दारात मुखदर्शनाची सुविधा असेल. त्याशिवाय महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलच्या बाजूनेही दर्शन रांगेचे नियोजन सुरू असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

नियोजनाची बैठक

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत देवस्थान समिती कार्यालयात आज नियोजनाची बैठक झाली. गर्दीचे नियोजन, सोशल डिस्टन्ससह नियमांच्या पालनाबाबत त्यांनी सूचना केल्या. श्रीपूजकांनाही रोजच्या पूजेचे नियोजन जलदगतीने करण्याची सूचना त्यांनी केली.

पावसामुळे तारांबळ

मंदिर परिसरातील रस्त्यांच्या कामाला आजपासून प्रारंभ झाला. पण, सायंकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे हे काम थांबवावे लागले. परिसरातील विक्रेत्यांबरोबरच मंदिरातील विविध कामे करणाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली.

सुवर्ण अलंकाराची आज स्वच्छता

मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असून देवीच्या पूजेतील चांदीची भांडी, प्रभावळ, सिंहासन या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता करण्‍यात आली. सोमवारी सकाळी गरुड मंडपात येथे देवीच्या नित्य वापरातील सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता होणार आहे.

शहरात १० स्‍क्रीन

दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरातील प्रमुख दहा चौकामध्ये एलईडी स्क्रीनच्या साहाय्याने अंबाबाईचे लाईव्ह दर्शन भाविकांना घेता येणार आहे. महाद्वार रोड, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर आदी दहा ठिकाणी हे स्क्रीन असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

SCROLL FOR NEXT