कोल्हापूर

...म्हणून घेतला युक्रेनमध्ये राहण्याचा निर्णय; भारतात परतलेल्या आर्याची आपबीती

....तर आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच कोल्हापुरात पोहचलो असतो.

लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: पहाटे पाचच्या सुमारास आईचा फोन आला आणि झोपेतून उठले तेंव्हा आम्हाला युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू असल्याचे समजले. खाण्या-पिण्यासाठी खरेदीला गेल्यावर मार्केटमध्ये पोचल्यावर गर्दी होती. मोजकेच एटीएम सुरू होते. तेथेही रांगा होत्या. हा सर्व युद्धाचाच परिणाम होता. मात्र आम्ही पश्‍चिम युक्रेन मध्ये राहत होतो आणि पूर्व युक्रेनमध्ये युद्ध सुरू होते. त्यामुळे टिचर (शिक्षक) सुद्धा आम्हाला युद्ध सुरू होणार आहे, सुरू आहे याची काहीच माहिती देत नव्हते.

हॉस्टेल मधील सिनिअर कुटुंबियांप्रमाणे सहकार्य करीत होते. इंडियन ॲम्बेसीचे एसएमएस येत होते. युद्ध सूरू होण्यापूर्वी आपल्या देशाने विमान तिकीटाचे दर कमी केले असते तर आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच कोल्हापुरात (Kolhapur) पोहचलो असतो. मात्र नेहमी पेक्षा दुप्पट दर होता आणि तो आम्हाला परवडणारा नसल्यामुळे आम्ही तेथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. युक्रेनमध्ये एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये गेलेली आणि शुक्रवार पेठ धनवडे गल्लीत राहणारी आर्या चव्हाण (Aarya Chawhan) तिचे अनुभव सांगत होती.

युद्ध सूरू होण्यापूर्वी आपल्या देशाने विमान तिकीटाचे दर कमी केले असते तर आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच कोल्हापुरात पोहचलो असतो.

आर्या सांगत होती, ‘युएसए’ने मात्र त्यांची ॲम्बेसी आणि विद्यार्थ्यांना युद्ध सुरू होण्यापूर्वीच हलविले होते. त्यामुळे आता युक्रेनमध्ये सर्वाधिक भारतातील विद्यार्थी आहेत, तर काही अफ्रिकेचे आहेत. भारतात ज्या शिक्षणासाठी सहा वर्षात पाच ते सहा कोटी रुपये लागतात तेच युक्रेन मध्ये २५ ते ३० लाख पुरेसे होतात. त्यामुळे आम्ही युक्रेनमध्ये एमबीबीएस करण्याचा निर्णय घेतला होता. येथे प्रवेश न मिळाल्यामुळे तिकडे जावे लागले.

युद्ध सुरू झाले त्याचा थेट आम्हाला त्रास होत नव्हता. मात्र सायरन वाजणे, मार्केटमध्ये गर्दी होणे अशी स्थिती होती. रोज आई, पप्पांचा कॉल होत होता. मात्र तेथून कोल्हापुरात येण्यासाठी मी ज्या इन्स्टीट्युट मधून युक्रेनला गेले त्याचे शिक्षक जयंत पाटील यांच्या मार्फत प्रयत्न सुरू झाले. तेथून मी आणि मैत्रिण ऋतुजा कांबळे दोघी सुमारे सहाशे किलोमीटर बॉर्डर ओलांडून रुमानिया मध्ये पोचलो. यावेळी माझा दिल्लीतील मित्र सिद्धेशचेही सहकार्य लाभले. रुमानियातील नागरिकांनी आम्हाला पाहिजे ती मदत केली. त्यांचेही आभार मानावे लागतील.

त्या दिवशी व्हिडिओ कॉल नाही...

रोज व्हिडिओ कॉलद्वारे होत होता. मात्र युद्ध सुरू झालेल्या दिवशी फोन कॉल केला. मी तिच्याशी बोलताना खंबीर होते. पण आतून खूप खचले होते. त्यामुळेच त्या दिवशी व्हिडिओ कॉल केला नाही. चेहरा पाहिला तर दोघीही खचून जाणार हे नक्कीच होते. माझी मुलगी परत येईल की नाही याची खात्री वाटत नव्हती. मात्र सर्वांच्या प्रयत्नाने ती आज परत आली. ती पहिलीला असताना तीने स्पर्धेत मी डॉक्टर होणार असे लिहिले होते. तो कागद आजही जपून ठेवला आहे, आर्याची आई नेहा सांगत होती. युद्ध संपले की ती पुन्हा युक्रेनमध्ये जाणार आहे, मात्र डॉक्टर होणारच असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात कुटुंबासोबत आर्या चव्हाण

मी कधी पुणे, मुंबईला गेलो नाही आणि मुलगी युक्रेनला जाणार याची थोडी भिती होती. मात्र तिला डॉक्टर बनायचे होते म्हणून आम्ही तयार झालो. भारताने युद्धापूर्वीच तेथील विद्यार्थ्यांना आपल्या देशात आणले पाहिजे होते. मात्र विमानाचे तिकीट दरही न परवडणारे होते. त्यामुळे किमान आता तेथे असलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे वडील नितीन चव्हाण सांगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT