महिनाअखेर पहिल्या डोसचे लक्ष्य पूर्ण करा sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : महिनाअखेर पहिल्या डोसचे लक्ष्य पूर्ण करा

पालकमंत्री सतेज पाटील; कोविड लसीकरण प्रोत्साहन योजनेंतर्गत सामाजिक संस्थांसमवेत बैठक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोणत्याही स्थितीत नोव्हेंबरअखेर लशीच्या पहिल्या डोसचे शंभर टक्के लक्ष्य पूर्ण करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. शासकीय विश्रामधाम येथे कोविड लसीकरण प्रोत्साहन योजनेतंर्गत सामाजिक संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘कोविडची तिसरी लाट थोपविण्यासाठी जनतेचे लसीकरण आवश्‍यक आहे. जनतेने दोन्ही डोस पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, ज्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे त्यांनी दुसरा डोस घ्यावा, ज्यांचे लसीकरण अपूर्ण आहे त्यांनी ते पूर्ण करावे, लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबर सामाजिक संस्थांनाही पुढाकार घ्यावा, अनाथ, फिरस्ती यांच्याकडे आधारकार्ड नसेल अथवा कागदपत्रे नसतील अशा लोकांचे लसीकरण करावे.’’

सोमवारी (ता. ८) सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी अपूर्ण लसीकरणाबाबत स्वयंसेवी संस्था तसेच संबंधितासोबत आढावा घ्यावा,त्या गावचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. सोमवारी तहसीलदार व बीडोओच्या आढावा बैठकीत जे लोक लसीकरणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, कामाबाबत गावनिहाय कार्यकर्त्यांची यादी तयार करावी अशी सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली.

आरोग्याधिकारी साळे यांनी लसीकरणाच्या आढाव्याचे सादरीकरण केले. पालकमंत्री तसेच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लसीकरणाचा वेग वाढविण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यात ८४ टक्के लोकांनी पहिला, तर ४१ टक्के लोकांनी दूसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील १४५ गावांतील अठरा वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण झाल्याचे माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT