moneylenders  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : कंत्राटी कामगार सावकारांचे टार्गेट

भीतीपोटी मोजक्याच तक्रारी; निनावी तक्रारीची पोलिसांनी दखल घेण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आज ना उद्या आपण कायम होणार, तुटपुंजा पगार वीस ते पंचवीस हजारांच्या घरात जाणार, अशी आशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना असते. घरखर्च, दवाखान्याची नड भागविण्यासाठी त्यांना नाईलाजाने खासगी सावकारांचा आधार घ्यावा लागतो. महिन्याला दहा टक्क्याने घेतलेल्या कर्जाचा डोंगर हळूहळू वाढत जातो. एका सावकाराचे देणं भागविण्यासाठी तो दुसऱ्या सावकारांकडून कर्ज काढतो. त्यातच तो पुरा डुबून जातो. भीतीपोटी मोजक्याच तक्रारी दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी सावकारांची खरी व्याप्ती समोर येत नाही.

महापालिकेचे विविध विभाग असो अगर खासगी क्षेत्रात अनेकजण कंत्राटी कामगार म्हणून काम करत असतात. अवघ्या काही हजारात त्यांचे वेतन असते. आपल्या कामाची कदर होईल, आपणही एक दिवस कायम होईल, अशी आशा त्यांना असते. त्यामुळे ते प्रामाणिकपणे काम करत असतात. गरज असतानाही त्यांना दुसरा पर्याय शोधता येत नाही. अनेक कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणूनच निवृत्त होतात. नुकतेच केएमटीमधील अनेक कर्मचारी अशा पद्धतीने सेवानिवृत्त झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे.

अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांसमोर घरखर्च, लग्नकार्य अगर अचानक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना पैशाची गरज असते; पण त्यावेळी बँकांत पत नसल्याने त्यांना कर्ज मिळत नाही. अशावेळी त्यांना खासगी सावकारांशिवाय दुसरा पर्याय नसतो. खासगी सावकारही असेच सावज शोधत असतात. महिन्याला दहा टक्के व्याजाने घेतलेले कर्ज हे वार्षिक १२० टक्‍क्यांचे असते. हळूहळू व्याज मुद्दलीचा डोंगर वाढत जातो. अखेरीस तो गळ्यापर्यंत येतो. भीतीपोटी चुकूनच एखादीच व्यक्ती तक्रार देण्याचे धाडस दाखविते.

इतर मात्र भीतीपोटी एकतर गाव सोडून पळून जातात अगर टोकाचा निर्णय घेतात; पण तक्रारीविना खासगी सावकारविरोधात कारवाई करण्यात अडचणी येतात, तरीही सहकार विभाग पोलिसांच्या मदतीने खासगी सावकारांविरोधात कारवाई करते. तक्रारीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता कंत्राटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रबोधन करावे. त्याचबरोबर निनावी तक्रारीची दखल घेऊन संबंधित सावकारांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT