Radhanagari Dam Kolhapur Rain News esakal
कोल्हापूर

Radhanagari Dam : तीन तासांत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

राजू पाटील

भोगावतीच्या पुरात आणखीन भर पडणार असून परिणामी उद्यापासून पंचगंगेची पाणी पातळी ही वाढण्याची शक्यता आहे.

राधानगरी : आज सकाळी साडेदहा पर्यंत राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) स्वयंचलित सात दरवाज्या पैकी चार दरवाजे खुले झाले आहेत. यातून वीज निर्मितीसाठी 7100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सध्या सुरू झाला आहे.

पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. कालपासून या धरणाच्या स्वयंचलित दरवाजाबाबत सोशल मीडियावरून अफवांचे पेव फुटले होते.

इंचा इंचाने पाणी वाढत असतानाच आधीच पंचगंगा आणि भोगावती नदीला आलेल्या पुराची तीव्रता आणखीन वाढण्याची भीती लोकांमध्ये जागृत झाली होती. दुसरीकडे हे धरण भरलेच पाहिजे हेही मत असताना आज रात्री केव्हाही स्वयंचलित दरवाजे खुले होतील, असा लोकांचा अंदाज होता.

मात्र, आज सकाळी आठ वाजता स्वयंचलित दरवाजांनी हा मुहूर्त साधला. वाऱ्याचा प्रचंड दाब असल्याने क्षमतेपूर्वीच सात पैकी सहा क्रमांकचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर दोन तासात आणखी तीन दरवाजे खुले झाले. सध्या तीन ते सहा असे सलग दरवाजे खुले आहेत. यामुळे भोगावतीच्या पुरात आणखीन भर पडणार असून परिणामी उद्यापासून पंचगंगेची पाणी पातळी ही वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT