Kolhapur Mumbai flight to be launched Indication that service will start after October 
कोल्हापूर

GOOD NEWS : लवकरच सुरू होणार कोल्हापूर-मुंबई विमानसेवा , असे आहे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी  (कोल्हापूर) : कोरोनामुळे खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नव्याने सुरू होणार आहे. दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सेवा सुरू राहील. २७ ऑक्‍टोबरनंतर सेवा सुरू होण्याचे संकेत विमानतळ प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


कोरोनाच्या काळात देशांतर्गत विमानसेवा बंद होती. त्यानंतर कोल्हापूर विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीची कोल्हापूर-हैदराबाद व कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर ‘इंडिगो एअरलाइन्स’ची कोल्हापूर-हैदराबाद सेवा सुरू झाली; परंतु प्रवाशांची प्रचंड मागणी असूनही मुंबई विमानतळावरून उड्डाणाला मर्यादा असल्याने कोल्हापूर- मुंबई विमानसेवा बंद होती. खासदार संजय मंडलिक व उद्योजकांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई विमानसेवा सुरू होत असून विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार आहे. आजपर्यंत १३६ दिवस विमानसेवा सुरू असून ७८४ विमानांचे आतापर्यंत आवागमन झाले आहे. 

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २७ ऑक्‍टोबर किंवा त्याच्या अगोदर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यासंदर्भात वरिष्ठांकडून संकेत मिळाले असले तरीही यासंदर्भातील अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
- कमलकुमार कटारिया, संचालक, विमानतळ प्राधिकरण

प्रवाशांचा प्रतिसाद
हैदराबाद, बंगळूर, तिरुपती व मुंबई विमान सेवांना प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. याचबरोबर कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवाही सुरू करण्याची मागणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे. लॉकडाउनमध्ये रेल्वे व इतर खासगी व सार्वजनिक बससेवा बंद असताना विमानसेवा मात्र प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

मुंबईतून उड्डाण    दुपारी १२.३० वा.
कोल्हापूरमध्ये आगमन    १.२५ वा
कोल्हापूरहून उड्डाण    १.५० वा.
मुंबईत आगमन    २.४० वा.
दर मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी विमानसेवा सुरू असेल.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir News : राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्यात प्रवेशासाठी 'गुप्त कोड'ची गरज! आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार

ज्याचा त्याचा विठ्ठल !

DMart Sale : नोव्हेंबर महिना सुरू होताच डीमार्टचा स्पेशल सेल सुरू; 70-80% पर्यंत डिस्काउंट ऑफर्स..सगळंकाही स्वस्त पाहा एका क्लिकवर

Numerology News : 'या' मूलांकाचे लोक कमी वर्षे जगतात..कितीही फिट अ‍ॅन फाइन असले तरी लवकर जग सोडतात, पाहा तुमचा मूलांक काय?

Venkateswara Temple : आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्‍वर मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT