kolhapur to mumbai travelling fast with the help of rider fast bus in kolhapur 
कोल्हापूर

कमी वेळात होणार मुंबई ते कोल्हापूरचा प्रवास ; प्रवाशांसाठी आता सुपर फास्ट रायडर बस

शिवाजी यादव

कोल्हापूर : सुरक्षित प्रवासी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनाकाळात कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाला मदत करण्यासाठी तसेच प्रवाशांना सौजन्यशील प्रवासी सेवा देण्यासाठी 'बस फॉर अस' या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेने एसटीची सीटर स्लिपर आराम बस दत्तक घेतली आहे. या बसव्दारे 'कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर' अशा मार्गावर 'सुपर फास्ट रायडर' म्हणून ही बस प्रवासी वाहतूक करणार आहे. 

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण मुंबईला ये-जा करीत असतात, अशा प्रवाशांना एसटीचा सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी 'बस फॉर अस' स्वयंसेवी संस्थेने एसटी महामंडळाची स्लिपर सीटर बस दत्तक घेतली असून याही बस बायपास मार्गे कोल्हापूर - मुंबई - मार्गावर प्रवास घडणार आहे. मोजकेचे थांबे घेऊन सलग धावणारी ही बस कमी वेळात मुंबई व कोल्हापूरात प्रवाशांना पोचवणार आहे. 

या बसमध्ये झोपून व आरामात बसून प्रवास करण्याची सुविधा आहे. 50 सिटरचीही बस आहे. या बस मध्ये सॅनिटाईझर, मोबाईल बॅटरी चॅर्जिंग, व्हायफाय, अशा सुविधा यामध्ये असणार आहे. या बसचे व्यवस्थापन हे 'बस फॉर अस' या संस्था या बसचे व्यवस्थापन करणार आहे. यात बस प्रवाशांना सौजन्यशील वागणूक मिळावी, गाडीच्या वेळीच माहिती मिळावी, गाडी अचूक वेळ सोडाणे, प्रवासी उपयुक्त सुविधा पुरेशा ठेवणे यापासून ते गाडीच्या तांत्रीक क्षमते पर्यंतच्या समस्या वेळोवेळी दुर करणे.

त्यासाठी प्रवाशाच्या सुचना, प्रतिक्रीया जाणून घेऊन या गाडीचे व्यवस्थापन 'बस फॉर अस' ही संस्था करणार आहे. वरील उपक्रमामुळे प्रवाशांना आदरयुक्त वागणूक मिळावी सुरक्षित प्रवास घडावा यातून एसटीच्या प्रवासी संख्या व महसुलात वाढ व्हावी अशा अपेक्षा आहेत. त्यासाठी येत्या 26 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्वावरही गाडी संस्थेतर्फे चालविण्यात येणार आहे. 

प्रजासत्ताक दिनी उद्घाटन

'बस फॉर अस' या संस्थेने दत्तक घेतलेली बस सुपर फास्ट बायपास रायडर म्हणून येत्या 26 जानेवारी पासून धावणार आहे. त्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर या बस सेवेचे उद्घाटन होईल. या बसची माहिती देण्यासाठी मुंबई व कोल्हापूर येथे स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ सुत्रांकडून देण्यात आली.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानात आत्मघाती हल्ला; १३ ठार, ३५ जखमी

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT