kolhapur municipal corporation commissioner mallinath kalshetti emotional in press conference 
कोल्हापूर

... आणि महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांना रडू कोसळे

डॅनियल काळे

कोल्हापूर - महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची तडकापडकी बदली झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कलशेट्टी यांना रडू आले. कोल्हापूरात मी रमलो, कधीही कंटाळलो नाही. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ट नागरिकांपर्यंत सर्वांनीच माझ्या कामाला दाद दिली. यापुढे देखील मी नेहमी कार्यरत राहीन, पण कोल्हापूरसारखे प्रेम आपल्याला कुठेही मिळाले नाही, असे सांगत असतानाच कलशेट्टी भावनाविवश झाले आणि त्यांना रडू कोसळले. 

कलशेट्टी म्हणाले, मला बदलीची माहिती नव्हती. नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचाचा मला फोन आला. त्यानंतर मी त्यांना तातडीने कार्यभार सोपविला आहे. आयुक्त म्हणून मला कोल्हापूरात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दर रविवारी स्वछता मोहीम घेण्यात आली. 75 रविवार सलग ही स्वछता मोहीम घेण्यात मला यश आले. या मोहिमेला लोकचळवळीचेच स्वरुप आल्याने महापूराच्या काळात या चळवळीचा चांगला उपयोग झाला. आयुक्त म्हणून काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. विशेषता पंचंगगा प्रदूषणप्रश्‍नी अनेक महत्वाचे निर्णय आणि कामे केली. बारा नाल्यावर बंधारे घालण्याच्या कामला सुरवात झाली. कचरा निर्गतीचा मोठा प्रश्‍न होता. सर्वांच्या सहकार्यातून बायोमायनिंगव्दारे कचरा निर्गत करण्यात यश आले. आता हळूहळू कचऱ्याचा डोंगर कमी होत आहे. कोल्हापूरकरांच्या सहकार्यातूनच ही कामे झाली. त्यामुळे कोल्हापूरात मी चांगला रमलो, मला कामाचा कधीही कंटाळा आला नाही. सर्वसामान्य माणूस देखील मला कधीही फोन करत होता. त्या प्रत्येक फोनला मी प्रतिसाद दिला. त्यामुळे या कामाची नोंद जनतेने घेतली. बदली झाली आता जे ठिकाण मिळेल तेथेही चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न राहिल. 

 कोरोना काळातील कामही महत्वाचे 

कोरोनाचे संकट आल्यानंतर कोल्हापूर शहरात अनेक लोकांनी मदत केली. विविध प्रकारची उपकरणे, मदत जी महापालिकेच्या निधीतून करणे शक्‍य नव्हते. अशा कामाला लोकांनी भरभरुन साथ दिली, मदत केली. हातभार लावला. त्यामुळे लाखो रुपयांची कामे लोकसहभागातूनच करण्यात यश आले. पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान करण्यापासून ते आयसोलेशन हॉस्पीटलला जनरेटर भेट मिळण्यापर्यंतचे लोकांचे सहकार्य मी कधीही विसरणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर जादा भार न टाकता कोरोना काळात कामे करण्यात आली. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Latest Marathi News Updates : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

Whatsapp Threaded Reply : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका भन्नाट फीचरची एन्ट्री! हे नेमकं कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरण विसर्ग सध्या १४ हजार ५४७ क्यूसेक; २० हजार क्युसेक होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT