hasan mushrif sakal
कोल्हापूर

‘राष्ट्रवादी’ला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न ; भाजप तयारीत

युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या सनसनाटी आरोपांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला डळमळीत करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

जिल्ह्यात दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला. जिल्ह्यात पुन्हा पाय रोवण्यासाठी तयारीच्या शोधात भाजप होते.मुश्रीफांवरील आरोपांमुळे ही संधी चालून आली. १९९९ मध्ये ‘राष्ट्रवादी’च्या स्थापनेपासून जिल्ह्याने सातत्याने या पक्षाला बळ दिले. २००९ मध्ये कागलमधून हसन मुश्रीफ यांनी वादळात दिवा लावला, ते विजयी झाले.

कागल तालुक्यात मंडलिक-मुश्रीफ गटात राजकीय वैमनस्यांतून अनेकदा खटके उडाले. या काळात मुश्रीफ यांच्यावर राजकीय आरोप झाले. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप कधी झाले नाहीत. जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’ वाढविण्यात मुश्रीफ यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पक्ष एके पक्ष आणि शरद पवार यांच्याशिवाय दुसरा विचार कधी मुश्रीफ यांनी केला नाही. जिल्हा परिषद, महापालिका, पालिका, पंचायत समिती यात राष्ट्रवादी विस्तारली, ती मुश्रीफ यांच्यामुळेच. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

कागल तालुक्यात मंडलिक-मुश्रीफ गटात राजकीय वैमनस्यांतून अनेकदा खटके उडाले. या काळात मुश्रीफ यांच्यावर राजकीय आरोप झाले. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप कधी झाले नाहीत.

शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आली. पावणेदोन वर्षांत सरकार अस्वस्थ करण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे मंत्री भाजपच्या रडारवर आहेत. मंत्री मुश्रीफ राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत. १७ वर्षे ते मंत्रिमंडळात आहेत. आघाडी सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री देऊन त्यांचा सन्मान केला गेला.त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या स्थानाला धक्का पोचविण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहे. सोमय्या यांच्या आरोपांत किती तथ्य आहे, हे काळाच्या ओघात स्पष्ट होईल. मात्र, नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांना घाबरत नाहीत. मात्र, पक्षातील स्थान डळमळीत झाले तर करायचे काय? असा प्रश्‍न त्यांना पडतो. जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या स्थानाला धक्का लावला की आपली पकड मजबूत होईल, असा भाजपचा प्रयत्न आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात गेली निवडणूक भाजपचे सध्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी लढविली. यापुढेही मुश्रीफ यांच्याविरोधात तेच आव्हान उभे करू शकतात. खासदार प्रा. संजय मंडलिक सध्या मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांत चलबिचल

मुश्रीफ यांनी पूर्वी राजकीय धक्के सहन केले आहेत. सध्याच्या धक्क्यातून ते सावरतील. मात्र, आरोपातून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. निवडणुका या कोणत्याही राजकीय पक्षासाठी नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ठरतात. निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या आरोपांमुळे ‘राष्ट्रवादी’त चलबिचल सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT