kolhapur municipal corporation initiative solar enery reduce electricity bill msedcl  esakal
कोल्हापूर

Solar Energy : सौरऊर्जा वापरा, बचत करा

महापालिकेने घ्यावा पुढाकार; विजेपोटी होणारा कोट्यवधींचा खर्च वाचणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पारंपरिक स्रोतामधून तयार केली जाणारी वीज वाचवण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. महापालिका पारंपरिक ऊर्जेवरच अवलंबून असून, कार्यालये, पथदिव्यांसाठी दरवर्षी ९३ लाखांवर युनिट विजेचा वापर केला जात आहे.

त्यासाठी महिन्याला एक कोटी व वर्षाकाठी सव्वासात कोटी रुपये खर्च होत आहेत. पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले रुग्णालय, छत्रपती शिवाजी मार्केट, आयुक्त बंगला येथेच वापरली जाणारी सौरऊर्जा अन्य ठिकाणीही वापरली तरी महापालिकेच्या खर्चात बचत होऊ शकते. याशिवाय पाणी उपसा पंपांसाठी वर्षाला ४२ कोटी महावितरणला द्यावे लागणार नाहीत.

महापालिकेने २०१५ मध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. त्यावेळी छत्रपती शिवाजी मार्केट या इमारतीसाठी बॅटरी बॅकअप असलेली सौर यंत्रणा वापरली. त्यानंतर २०१८ मध्ये पंचगंगा हॉस्पिटलसाठी, तर २०२० मध्ये आयुक्त बंगल्यासाठी वापर केला.

या दोन्ही यंत्रणा नेट मीटरिंगच्या माध्यमातून राबवल्या. एक हजारच्या आसपास युनिट विजेची बचत केली जात आहे. हे प्रमाण महापालिकेच्या एकूण वीज वापराच्या तुलनेत अत्यल्प आहे. पाणी उपसा पंपांना मोठ्या प्रमाणात वीज लागत असल्याने महापालिकेच्या खर्चातील सर्वाधिक वाटा त्यांचा आहे.

त्यापाठोपाठ शहरातील पथदिव्यांवर महापालिका विजेचा खर्च करत आहे. तीन वर्षांपूर्वी एलईडी दिवे बसवल्याने वीज बिलात दीड कोटी रुपयांचा फरक पडला आहे; पण अजूनही सात कोटींवर केवळ पथदिव्यांसाठी खर्च केला जात आहे. तर सर्व कार्यालयांसाठी अडीच ते पावणेतीन लाख युनिट वीज लागते. त्याचे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे बिल येत आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाजासह पदाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या इमारतीचा विजेचा खर्च जास्त आहे. ही इमारत हेरिटेज असल्याने त्यावर सौर यंत्रणा उभी करणे कठीण आहे; पण शेजारील छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीवर त्या इमारतीसह मुख्य इमारतीसाठीची यंत्रणा उभी केली जाऊ शकते.

इतर तीन विभागीय कार्यालयांच्या इमारती, वॉर्ड दवाखाने, रुग्णालये, आरोग्य विभागाची कार्यालये, केएमटी अशा विविध ठिकाणी सौर ऊर्जेची संधी आहे; पण आता छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये असलेली जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा लावण्याचे प्रस्तावित केले आहे.

हेरिटेज इमारतींमुळे काही कार्यालयांच्या ठिकाणी सौर यंत्रणा उभी करण्यात अडचणी आहेत. त्याशिवाय इतर कार्यालयांचा प्रस्ताव तयार केला जात आहे. पथदिव्यांसाठी मात्र अजून काही विचार केलेला नाही.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.

पथदिव्यांचा वीज वापर (वार्षिक)

वर्ष - युनिट - बिल

२०१८-२०१९ - १११७५६६० - ८२२३९७६०

२०१९-२०२० - १०२११८७२ - ८१५६५८९०

२०२०-२०२१ - ९४०५८०० - ७२११७८४२

२०२१-२०२२ - ९११४४३२ - ७१५१२०००

पथदिव्यांची संख्या - ३१२४१

महापालिका कार्यालयांचा वीज वापर (वार्षिक)

वर्ष - युनिट - बिल

२०१९-२०२० - २६९४२९ - २५१९३२०

२०२०-२०२१ - २५०४७४ - १९३५६००

२०२१-२०२२ - २७४८०९ - १२६१७००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT