kolhapur municipal corporation kolhapur 
कोल्हापूर

 कोल्हापूर महानगरपालिका पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात राज्यात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 46 टक्के फेरीवाल्यांना कर्ज वितरण करुन कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांकावर आघाडी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमध्ये पथविक्रेत्यांना अर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्याने केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेतून दहा हजार रुपये कर्जपुरवठा करण्याची ही केंद्राची योजना आहे. 

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना प्रत्येकी 10000/- रुपये पथपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 6 हजार 610 पथविक्रेत्यांनी अर्ज केले असून यापैकी आतापर्यंत 4 हजार 312 पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळून यापैकी 3 हजार 16 लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. यापैकी शहरातील बॅंकांनी जवळपास 1 हजार 276 जणांचे कर्ज मंजूर केले आहे. राज्यात इतर सर्व महानगरपालिकेच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिका आघाडीवर असून आजअखेर महानगरपालिकेने दिलेल्या उदिृष्टापैकी सर्वात जास्त कर्जाचे वाटप केलेले आहे. याबाबत ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतू त्यांची कागदपत्रे अपूर्ण होती त्यांच्यासाठी शनिवार (ता.2) जानेवारी 2021 रोजी शहरातील सर्व बॅंकामध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. 

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिका क्षेत्रात अधिक गतीने राबवून कोल्हापूर महानगरपालिका राज्यात आघाडीवर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेतून महानगरपालिका क्षेत्रातील एकही पथविक्रेता वंचित राहू नये, यासाठी प्रशासक सर्वतोपरी मदत करेल असे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT