Kolhapur Municipal Corporation official fined for walking without mask 
कोल्हापूर

महापालिकेचे अधिकारीच फिरत होते विना मास्क ; आयुक्तांनी पाहताच केली अशी कारवाई  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिका परिसरात मास्कशिवाय फिरणारे आस्थापन अधिक्षक सागर कांबळे यांना आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी 500 रूपये दंड ठोठवला. आयुक्त डॉ. कलशेट्टी सोमवारी महापालिकेच्या मुख्य इमारती मधील कार्यालयात येत होते. यावेळी श्री. कांबळे महापालिकेच्या परिसरातील रस्त्यावर विना मास्क फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आयुक्तांनी तात्काळ त्याच ठिकाणी त्यांनी मास्क न वापरलेच्या कारणामुळे 500 रुपये दंडात्मक करवाई करण्याच्या सुचना आरोग्य निरिक्षक यांना दिल्या. यांनतर आस्थापन अधिक्षकास विना मास्क वापरण्याची सक्त ताकीद दिली. 

कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मास्क न घालणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी महापालिकेचे पथक ही शहरात फिरत आहे. एकीकडे नागरिकांवर कडक करवाई केली जाते. तर दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मास्क न घालता फिरत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन नियम सर्वांना समान असल्याचा संदेश दिला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT