kolhapur Municipal Corporation  sakal
कोल्हापूर

kolhapur : पाणीपुरवठा टाक्यांकडे दुर्लक्ष

आर. के. नगर परिसरात गवतामुळे अस्वच्छता; झाकण नसल्याने टाक्यांची दुरवस्था

- प्रकाश पाटील

कंदलगाव : सुभाषनगर पंपिंगमधून उपसा केलेल्या पाण्याचा पाचगाव, मोरेवाडी परिसरातील ३५ पेक्षा जास्त कॉलनींना व मुळगावांना पुरवठा करण्यासाठी आर. के. नगर टेकडीवरील दोन टाकीत साठा केला जातो. हा साठा झालेल्या पाण्याचा रितसर पुरवठा करण्यात येतो. मात्र, येथील टेकडीवर असणाऱ्या दोन पाण्याच्या टाकींची दुरवस्था झाल्याने परिसरात पडलेली झाडे, मोठे गवत व दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत महापालिका पाणीपुरवठा जल अभियंता हर्षजित घाटगे व उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झाला नाही.

या ठिकाणी जीवन प्राधिकरण व महापालिकेची प्रत्येकी एक टाकी आहे. यामधून आपआपल्या परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या दोन्ही विभागाकडून सुरक्षा व स्वच्छतेबाबत कोणतीही उपाययोजना होत नाही.

जीवन प्राधिकरण व महापालिका या दोन विभागाकडून या ठिकाणचा वापर केला जातो. मात्र, स्वच्छतेबाबत एकमेकांकडे बोट दाखविले जाते. मग या परिसराची जबाबदारी घेणार कोण हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सुमारे पाच लाख लिटरसाठा असणाऱ्या दोन टाक्या आहेत. या टाकीत जमा होणारे पाणी टाकीला झाकण नसल्याने उघड्यावर आहे. या ठिकाणी सुरक्षा नसल्याने मद्यपी, नशेखोर तरुणांचा वावर असतो. संरक्षक भिंतीचा दरवाजा २४ तास उघडा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Uttrakhand : कुंभमेळ्यासाठी हरिद्वारमध्ये निर्माण केले जाणार नवे शहर; ३२ सेक्टर, एक पोलिस स्टेशन आणि एक रुग्णालयाचा असेल समावेश

Dhule News : दिवाळीत प्रवाशांना दिलासा! धुळे एसटी विभागाचा 'मेगाप्लॅन': ७३० बसेसद्वारे विशेष वाहतूक नियोजन

PCOS and Pregnancy Diabetes: PCOS आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याच्या शक्यतेचा काय आहे संबंध? जाणून घ्या उपाययोजना

Tejas MK 1A: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इतिहास घडवणार! तेजस एमके १ए लढाऊ विमान उड्डाणासाठी सज्ज, पण नाशिकमधून उड्डाण का?

SCROLL FOR NEXT