Kolhapur Municipal Corporation's budget will be announced today 
कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेचे आज अंदाजपत्रक, प्रशासक बलकवडे करणार जाहीर

डॅनिअल काळे

कोल्हापूर ः कोल्हापूर महपालिकेचा 2021/2022 चा अंदाजपत्रक उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षभर महापालिकेलाही 70 कोटींचा दणका बसला आहे. याचा परिणाम अंदाजपत्रकावर होण्याची शक्‍यता आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे अंदाजपत्रक जाहीर करणार आहे. दरवर्षी प्रशासन स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करते. स्थायी समिती अंदाजपत्रकात सूचनांचा समावेश करून अंतिम अंदाजपत्रक महापालिकेच्या सभागृहात सादर करून ते मंजूर केले जाते. यंदा सभागृहच अस्तित्वात नसल्याने उर्वरित सर्व प्रक्रिया रद्द झाल्या असून प्रशासक जाहीर करतील, तेच अंदाजपत्रक असणार आहे. 
महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी 31 मार्चअखेर सादर करून ते सभागृहात मंजूर केले जाते. यंदाच्या वर्षी सभागृहच अस्तित्वात नाही. 2015 ला निवडून आलेल्या सभागृहाची मुदत नोंव्हेंबर 2020 ला संपली; पण कोरोनाच्या प्रसारामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीऐवजी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडेच यांना अंदाजपत्रक संदर्भातील अंतिम अधिकार आहेत. गतवर्षी महापालिकेने 464 कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरुन अंदाजपत्रक सादर केले होते; पण कोरोनाचा मोठा फटका पालिकेच्या उत्पन्नालाही बसल्याने या अंदाजपत्रकावर परिणाम झाला आहे. परिणामी 70 कोटी तुटीचे अंदाजपत्रक उद्या सादर केले जाणार आहे. 

उत्पन्न घटले; अनुदानाने तारले 
कोरोनामुळे पालिकेला सुमारे 70 कोटींचा फटका बसला आहे. उत्त्पन्न घटले असले तरी निवडणुकीच्या तोंडावर शहरात मूलभूत सोयी, सुविधांसाठी सुमारे 60 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 25 कोटीचा निधी विकासकामांसाठी मिळाला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुमारे 15 कोटीचा निधी आणला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दलित वस्तीसाठीचा 11 कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे पलिकेला सुमारे पन्नास ते साठ कोटी अतिरिक्त सरकारी अनुदान मिळाल्याने उत्पन्न घटले असले तरी विकासकामाला निधी मिळाला आहे, हे वैशिष्ट्य आहे. 
- संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT