Kolhapur Crime News Sakal
कोल्हापूर

Kolhapur Crime News: डोक्यात दगड घालून पत्नीचा निर्घृण खून चारित्र्याचा संशय, ऊसतोड मजुराचे कृत्य

एका ऊसतोड मजुराने आज चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.

सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे : एका ऊसतोड मजुराने आज चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगे पुलाजवळ हा प्रकार घडला. स्नेहल नितीन अहिवळे (रा. खडकी, ता. मंगळवेढा) असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकारानंतर पती नितीन सकाळी करवीर पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे सकाळी काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली.

याबाबत करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः नितीन दगडू अहिवळे पत्नी स्नेहलसह टाकळीवाडी येथे ऊस तोडणीचे काम करतो. तो सातत्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असे. त्याने सोमवारी रात्री स्नेहलला फिरायला जाण्याच्या निमित्ताने कोल्हापूर -गगनबावडा रस्त्यावरील बालिंगे पुलाजवळ घेऊन आला.

पुलाशेजारी असणाऱ्या एका उसाच्या शेतात त्याने तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. काही वेळाने बांधावरील मोठा दगड उचलून त्याने स्नेहलच्या डोक्यात घातला. तिचा जागीच मृत्यू झाला.

नितीन सकाळी सातच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलिस ठाण्यात पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT