kolhapur narsobawadi datta temple under in water due to water 
कोल्हापूर

कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; नृसिंहवाडीचे दत्त मंदिर दुसऱ्यांदा पाण्याखाली 

जितेंद्र आणुजे

कोल्हापूर - धरणपाणलोट क्षेत्रासह कोल्हापूर जिह्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना, राधानगरी, वारणासह धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 24 तासात सहा फूटाने वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरातील कमी झालेले पाणी पुन्हा एकदा वाढल्याने चालू मौसमातील दुसरा दक्षिणदार सोहळा झाला आहे.

 निम्म्या मंदिराला कृष्णेचा वेढा पडला आहे. कुंरूदवाड-अनवडी, कुंरूदवाड-शिरढोण दरम्यान असणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठलगत असणारी वैरण पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आणखी पाणी वाढल्यास नागरी वस्तीत पूराचे पाणी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यां पैकी चार दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. यातून व वीज गृहातून 7056 इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.  दरम्यान काळम्मावाडी धरण 95 टक्के भरले असून याचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 5886 क्यूसेक व विजगृहातून 1800 असा 7686 क्यूसेकचा विसर्ग केल्याने दुधगंगासह भोगावतीच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

IND vs WI: भारताविरुद्धच्या T20-वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; धाकड खेळाडूची झाली दमदार वापसी, पहा संपूर्ण संघ

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज! मध्य रेल्वेसह हार्बरवर २२ विशेष लोकलची घोषणा; कधी कोणती धावणार?

बोलता-बोलता सलमान खानच्या छातीत उठल्या तीव्र कळा ; पाणी मागितलं, डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं, बिग बॉसच्या घरातील Viral Video

Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; 500 मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...

SCROLL FOR NEXT