kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur News : इचलकरंजीत पत्नीवर कोयत्याने हल्ला,चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात कृत्य

कोयत्याने पत्नी गौरीच्या दोन्ही पायावर टोचेने मारहाण केली. आणखी वार करत असताना गौरी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - भररस्त्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात हातापायावर गंभीर वार झाल्याने पत्नी जखमी झाली. याप्रकरणी सचिन शिवाजी मोरबाळे (वय ३८, रा. कृष्णा नगर) याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद जखमी गौरी सचिन मोरबाळे (वय २५, रा. नमाजगे माळ) यांनी पोलिसांत दिली आहे. ही घटना येथील भगतसिंग गार्डन मार्गावर घडली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी गौरी मोरबाळे व संशयित सचिन मोरबाळे हे दोघे पती पत्नी आहेत. दोघेही येथील भगतसिंग गार्डन येथून पायी चालत जात असताना चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी पती सचिन याने हातातील पिशवीतून कोयता बाहेर काढला.

कोयत्याने पत्नी गौरीच्या दोन्ही पायावर टोचेने मारहाण केली. आणखी वार करत असताना गौरी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर मारहाण झाली. त्याने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जखमी गौरी यांच्या फिर्यादीनुसार पती सचिन याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT