kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur Flood Updates : पुराचे कारण शोधण्यासाठी पंचगंगेची पाहणी, अभ्यास करून अंतिम अहवाल तयार होणार

२००५, २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या पुराचा अंदाज घेऊन पुराची कारणे शोधण्यासाठी विविध पातळ्यावरती प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या पुराचे कारण शोधले जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या पथकाने पंचगंगा नदीची आज पाहणी केली. नदीत असलेल्या पुलाचा यावर कोणता परिणाम होतो यांसह इतर शास्त्रीय कारणांचा अभ्यास केला जाणार आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही दिवसाच्या पावसामुळे अचानक येणारा महापूर येत आहे. २००५, २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या पुराचा अंदाज घेऊन पुराची कारणे शोधण्यासाठी विविध पातळ्यावरती प्रयत्न सुरू आहेत.

याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर पाटबंधारे विभागाने आज पंचगंगा नदीमध्ये असणाऱ्या पुलाचा कोणता परिणाम होतो का याची पाहणी केली. जुन्या आणि कमी उंचीच्या पुलामुळे नदीतून पाणी वाहताना काही अडथळे निर्माण होतात का, याची सर्वंकष माहिती आज घेण्यात आली.

यामध्ये आणखी काही दिवस याचा अभ्यास करून अंतिम अहवाल तयार करण्यात येईल. या अहवालामध्ये पुराची सर्व कारणे नमूद केली जातील तसेच पुलाचा अडथळा ठरतो का यावरही भाष्य केले जाणार आहे. आज पाटबंधारेच्या अभियंता स्मिता माने यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून जाऊन पुलाची पाहणी करण्यात आली.

पंचगंगा पुराची कारणे शोधण्यासाठी हा अभ्यास केला जात आहे. यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांबाबत विस्तृत असा अहवाल तयार केला जाईल. अभ्यासादरम्यानचे निष्कर्ष नोंदवली जाणार आहेत.

स्मिता माने, पाटबंधारे विभाग अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT