hasan mushrif  Esakal
कोल्हापूर

Kolhapur News : गळीत हंगामातील हप्त्याबाबत शेट्टींशी चर्चेतून मार्ग काढू - मुश्रीफ

साखर कारखान्यांनी ठरलेली एफआरपी दिलेली आहे. कारखान्यांच्या उत्पनातील जी काही रक्कम येईल ते दिली जातील.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या गळीत हंगामातील हप्त्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. यातून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे सांगितले. भवानी मंडप येथे ‘शाही दसरा महोत्सवा’साठी आलेल्या मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘माजी खासदार राजू शेट्टी यांनी लेखापाल यांचे पथक तयार करून कारखान्यांची बँक खाती तपासावीत. ज्या कारखान्यांच्या खात्यावरील रक्कम अधिशेष (सरप्लस) आहे, त्या कारखान्यांना जादा दर द्यायला लावू; पण कारखाने कर्जात असतील तर पुढे काय करायचे,

हेही सांगितले पाहिजे. साखर कारखान्यांनी ठरलेली एफआरपी दिलेली आहे. कारखान्यांच्या उत्पनातील जी काही रक्कम येईल ते दिली जातील; पण अजून त्याची बैठक झालेली नाही. साखरेचे दर आता वाढले आहे; मात्र कारखान्यांवर मोठी कर्जे आहेत. याचाही विचार झाला पाहिजे. ’’ पर्यटन विभागाचे कार्यालय कोल्हापुरातून स्थलांतरित झाले आहे. ते पुन्हा येथे आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

प्रकाश आवाडे यांनी काळजी घ्यावी

इंचलकरंजीच्या जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याची जबाबदारी आपली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी सध्या सण सुरू आहेत. याला गालबोट लागू नये, याची काळजी घ्यावी. इचलकरंजीला पाणी देण्याचे वचन मी दिलेले आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT