Raju Shetti sakal
कोल्हापूर

कोल्हापुरात 'मविआ'च्या विजयानंतर राजू शेट्टी म्हणाले, उत्तरचा विजय...

आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती-राजू शेट्टी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर निवडणूकीचा आज निकाल जाहिर झाला. यात महाविकास आघाडीचा विजय तर भाजपाचा पराभव झाला. या निकालावर राजकिय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी या विजयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा विजय जनतेचा कौल वगैरे काही नाही. आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत राजकारण सुरू आहे. महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. शेती मालाला भाव नाही, योग्य नियोजन नाही, डाळी, तेल प्रचंड महागले आहे. वीज, शेती विद्यार्थी बेरोजगारी, इंधन दरवाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात भोंग्यावरून पातळीहीन राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा घात केला. त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे कसलेही भले होणार नाही याची खात्री पटली आहे. आता राज्यात शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार आहे. आम्ही तयार केलेले आमदार आम्हाला सोडून जातात ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, अशा गद्दारांना बरोबर ठेवून कधीच काम करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT