Sangappa Honkamble Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : प्रत्येकी १६ लहान चप्पल जोडून बनविली जोडी

संगाप्पा होनकांबळे यांची कलाकुसर : चप्पला पाहण्यासाठी गर्दी

परशराम के

अथणी : प्रत्येकाच्या अंगात कोणता ना कोणता सुप्तगुण दडलेला असतो. त्याला योग्य वळण मिळाल्यास त्यातून नवनिर्मिती होऊ शकते, त्याचा प्रत्येय सध्या अथणी शहरात येत आहे. येथील कारागीर संगाप्‍पा होनकांबळे यांनी प्रत्येकी १६ लहान चप्पल जोडून चप्पल जोडी बनविली आहे. कलाकुसरीने साकारलेल्या या १२ हजार रूपये किंमतीच्या चप्पलाला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

संगाप्पा होनकांबळे हे चर्मकार व्यवसायात २५ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत ते कामात व्यस्त असतात. चप्पल शिवणे, चप्पल वेगवेगळ्या प्रकारे चप्पल करणे यात त्यांचा हातखंडा आहे. त्यातूनच हे अनोखे चप्पल त्यांनी साकारले आहे. यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. या चप्पलास त्यांनी `पुठमल्ली` असे नाव दिले आहे.

बनविलेले चप्पल दोन फूट लांबीचे आहे. या एका चप्पलवर सोळा लहान-लहान चप्पल बसविल्याने अनोख्या कलाकृतीची निर्मिती झाली आहे. त्याची किंमत बारा हजार रुपये आहे. अनोखे चप्पल पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

अथणी शहर व ग्रामीण भागात चप्पल उद्योग आहे. परंतु सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहाय्य मिळत नसल्याने उद्योजक मेटाकुटीस आला आहे. दिलासा देण्यासाठी सरकारने दरमहा ५ हजार रूपये मानधन द्यावे. वयाच्या साठाव्या वर्षानंतर कारागीरांना पेन्शन द्यावी, अशी मागणीही संगाप्पा होनकांबळे यांनी केली आहे.

`पुट्टनंज्या` चित्रपटातून संकल्पना

अभिनेते रविचंद्र याने `पुट्टनंज्या` या चित्रपटात अशा प्रकारचे चप्पल परिधान केले आहे. त्यावरून नाविन्यपूर्ण चप्पलची संकल्पना संगाप्पा होनकांबळे यांना सुचली. चित्रपटातील नायकाच्या अदाकारीने भूरळ घातल्याने या चप्पलाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपण २५ वर्षांपासून या व्यवसायात आहोत. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नातून ही चप्पलची जोडी बनविली आहे. त्यास पाहण्यासाठी अनेक लोक येत असल्याने आपण घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान वाटते.

- संगाप्पा होनकांबळे, कारीगीर, अथणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT