शहराच्या १३५ चौरस किलोमीटरचे ड्रोनद्वारे फोटो sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पुराचे ड्रोनद्वारे चित्रीकरण

प्रशासनाची तयारी; पंचगंगा, कृष्णेवरील भराव काढण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिरोळ तालुक्‍यात नव्याने होणाऱ्या पंचगंगा व कृष्णा नद्यांवरील पुलाच्या दुतर्फा टाकलेले भराव तत्काळ काढून घ्यावेत. याठिकाणी पाणी प्रवाहित होण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याशिवाय, जिल्ह्यातील २७ पूर्णत: बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांचे शाळा, समाजमंदिर, सांस्कृतिक सभागृहस याशिवाय इतर ठिकाणी स्थलांतरण केले जाणार आहे. याचे नियोजन पूर्ण केले. पूरबाधित शहरी आणि ग्रामीण भागाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून जतन केले जाईल. २०२१ प्रमाणे महापूर आल्यास यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नियोजन केले. ज्या-ज्या गावात ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या योजनांना गळती आहे, ती युद्धपातळीवर दुरुस्त केली.

हजार लोकांमागे चार हजार

शुद्ध पाण्याच्या बाटल्या

पूरग्रस्त गावांत पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी एक हजार लोकांमागे चार हजार शुद्ध पाण्याच्या बाटल्या दिल्या जाणार आहेत. यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांची माहिती घेतली.

करवीर व शिरोळमधील पूरबाधित गावांत जनावरांची व पक्ष्यांची (पोल्ट्री) संख्या निश्‍चित करून संरक्षण देणार जनावरांना १० दिवस पुरेल एवढा चारा व औषध देणार महापूर आल्यावर पॉवर ट्रान्स्फॉर्मर बदलावा लागणार नाही

जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्‍भवल्यास सर्व खबरदारी घेण्यात येईल. त्यादृष्टीने गाव आणि तालुका पातळीवर योग्य नियोजन केले आहे.

- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

SCROLL FOR NEXT