kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आखरी रस्त्यावर

पंचगंगाकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आज गंगावेश ते पंचगंगा स्मशानभूमी रस्त्यावर आले. गायकवाड वाड्यापर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. दिवसभर शहरात कमी-जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदीकाठी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कमी अधिक प्रमाणात दिवसभर पाऊस सुरूच होता. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत राजाराम बंधारा येथे नदीची पातळी ३७ फूट ४ इंच इतकी होती. पंचगंगा नदीचे पाणी दोन दिवसांपूर्वी पात्राबाहेर पडले आहे. आज गंगावेश ते पंचगंगा स्मशानभूमी या आखरी रस्त्यावर पाणी आले. गायकवाड वाड्याच्या भिंतीला पाणी लागले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पंचगंगा तालीम आणि शिवाजी पूल चौक येथे बॅरिकेडस्‌ लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. येथे पोलिसांनी बंदोबस्तही लावला आहे.

अद्याप जुन्या शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू आहे. नदीचे पाणी आसपासच्या परिसरात पसरल्याने पूरजन्यस्थिती उद्भवली आहे. नदीचे हे अथांग रूप पाहण्यासाठी नागरिक येथील पिकनिक पॉइंटच्या बागेत येत आहेत. राजाराम बंधारा परिसरात पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, आज पावसात सातत्य असल्याने पूरग्रस्त भागात नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची गस्त या भागात सुरू आहे.

गाडीने घेतला पेट

शिवाजी विद्यापीठासमोर कोल्हापूर-कागल रस्त्याजवळ एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जावून ही आग आटोक्यात आणली. दुपारी २.१५ वाजता ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीचे सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

क्षीरसागर घेणार आज आढावा

कोल्हापूर : संभाव्य पूरस्थिती संदर्भात आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उद्या (ता. १५) घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक वाजता बैठक होईल

झाड उन्मळून पडले

येथील रुइकर कॉलनी भागात एक झाड उन्मळून पडले. याबाबतची वर्दी येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी झाड कापून बाजूला केले. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही. पापाची तिकटी येथे शॉर्टसर्किट होण्याची घटना घडली. मात्र, यात कोणतेही नुकसान झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT