kolhapur pattankodoli bhaknuk yatra 2020 
कोल्हापूर

बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात पट्टणकोडोलीचा भाकणूक सोहळा 

सचिनकुमार शिंदे

पट्टणकोडोली - बिरोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत, धनगरी ढोल व कैताळांच्या निनादात, भंडारा आणि लोकरीच्या उधळणीत कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील प्रसिध्द श्री.विठ्ठल बिरदेव य‍ात्रेतील फरांडेबाबांचा हेडाम व भाकणूक सोहळा आज संपन्न झाला.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असणार्‍या या यात्रेस महाराष्ट्र, कर्णाटक, आंध्रप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या कानाकोपर्‍यातून लाखो भावीक येतात. मात्र चालू वर्षी कोरोनामूळे यात्रा रद्द काण्यात आल्याने मोजक्याच मानकर्‍यांच्या उपस्थितीत यात्रेचा मुख्य सोहळा आज पार पडला.
 आज सकाळी प्रथेपरंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरवात झाली. गाव चावडीमध्ये मानाच्या तलवारींचे पुजन करण्यात आले. निवडक वीस मानकरी व शासकीय अधिकारी या तलवारी घेवून विठ्ठल बिरदेव मंदिराकडे आले. फरांडेबाबांना देवाच्या भेटीचे निमंत्रण दिले.

यात्रेचा केंद्रबिंदु असलेले फरांडेबाबा (खेलोबा वाघमोडे) हे नेहमी यात्रेच्या दोन दिवस आधी पायी चालत येवून मंदिरासमोरील दगडी गादिवर विराजमान होतात. यात्रेच्या मुख्य दिवशी या गादी समोर हेडाम नृत्य करुन मग मंदिरात प्रवेश करातात. यंदा मात्र गर्दी होउ नये यासाठी शासनाच्या सुचनांनुसार फराडेबाबा आज सकाळी बंदोबस्तात गावात आले.

देवाच्या भेटिचे निमंत्रण स्वीकारुन मंदिराच्या सभामंडपातच हेडाम नृत्य (पोटावर तलवार मारुन घेणे) केले व तिथेच भाकणूक (देववाणी) केली. यावेळी जमलेल्यांनी उधळलेल्या भंडार्‍या मुळे संपूर्ण मंदिर सोनेरी होउन गेले. धनगर मानकर्‍यांनी लोकरीची ही उधळण केली. यावेळी शेकडो मानाच्या छत्र्यां ऐवजी कांहीच छत्र्यांना प्रवेश दिला होता. त्याच मंत्रमुग्ध होवून भावीक फिरवत होते.


कोरोनामुळे यात्रा रद्द केली असली तरी भाविक येणार परंतु, त्यामुळे गर्दि होवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. गावापासून सुमारे १५ किलोमिटर अंतरा पर्यंत ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारले होते. मंदिर परिसराला लाकडी कंपाउंड करुन आत कोणी येवू नयेत याची काळजी घेतली होती. 

यासाठी हुपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र मस्के यांनी आणखी ७ सहाय्यक पोलिस निरिक्षक, पोलिस हवालदार १५०, ट्रफिक पोलिस २५, होमगार्ड २५, स्वयंसेवक ५० इतका पोलिस फाटा तैनात केला होता. अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, प्रांतअधिकारी विकास खरात, तहसीलदार प्रदिप उबाळे, अप्पर तहसीलदार शरद पाटील, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी आदी अधिकार्‍यांनी भेटी दिल्या.
 


भाकणूक 

पेरा
 रोहीणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल. 

पर्जन्य- ७ दिवसात पाऊस पडेल.
भक्ती- माझी सेवा जो करील त्याला माझ्या कांबळ्याखाली घेईन.

धारण- खळ्याकाठी सव्वा दोन ते अडीच पिकल.
रोगराई - कानानं ऐकाल पण डोळ्याने पाहणार नाही.

धान्य- रस भांडं व तांबडं धान्य कडक होईल. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT