kolhapur people may be used masks at home say municipal commissioner 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांनो घरातही आता वापरावा लागणार मास्क?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता तर कोरोना रूग्णांच्या संखेने जिल्ह्यात पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशिल आहे. पंरतु, कोरोना आटोक्यात येत नाही. या पार्श्वभूमिर आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या संदर्भातल्या सूचना बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापुरकरांना आता घरातही मास्क वापरावा लागण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर शहरातील समूह संसर्ग वाढला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनग्रस्तांची संख्या अकराशेच्यावर पोहोचली आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आयुक्त कलशेट्टी यांनी हा एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहरांमध्ये दाट वस्तीच्या या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडायची असल्यास काही वेगळे पर्याय अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे मत आहे. एखाद्याच्या घरात कमी जागा असेल आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या जर जास्त असेल तर कोरोनाचा धोका जास्त असतो. त्यातच कुटुंबातील एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर संपूर्ण कुटुंबाला त्याची लागली होती होते. हे आतापर्यंतच्या निरीक्षणावरुन समोर आले आहे. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये बाहेरील व्यक्ती कपडे किंवा इतर घर कामासाठी येत असतात. ही व्यक्ती इतर ठिकाणीही काम करत असते. त्यामुळे बाहेरील व्यक्तीमुळे घरातील नागरिकांना धोका पोहोचू नये, यासाठी घरामध्ये देखील मास्क वापरणे गरजेचे असल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले.

 कलशेट्टी यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात लहान मुले आणि आणि वयोवृद्ध व्यक्तींची काळजी अधिक घेणे गरजेचे आहे. अशावेळी काही कामानिमित्त कुटुंबातील तरुण सदस्य घराच्या बाहेर जाऊन आला असेल तर किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊन आला असेल तर आपल्या कुटुंबाची काळजी म्हणून वयोवृद्ध नागरिकांसह घरातील नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT