kolhapur Police begin action on those who went on Morning Walk 
कोल्हापूर

मॉर्निंग वॉकला निघाले अन् थेट पोहचले...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - संचार बंदीच्या काळात विनाकारण वाहनावरून फिरणाऱ्या बरोबर आता मॉर्निंग वॉक वर जाणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा सुरू केला. जुना राजवाडा पोलिसांनी आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 27 जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.  त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात नव्हे तर देशात संचारबंदी लागू आहे. आपल्या घरातच रहा आणि सुरक्षित रहा असे वारंवार आवाहन पोलिस यंत्रणेकडून केले जाते. यापूर्वीही मॉर्निंग वॉक घेणाऱ्या ना पकडून त्यांचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोलिसांनी पाठवले होते. तरीही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. भाजी,  गॅस सिलेंडर, औषधे खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात त्याच बरोबर मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या संख्या कमी नाही. कसबा बावडा येथे काल आणखीन एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.  राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या 27 नागरिकांवर पोलिसांनी ही कारवाई केली. यात तरुण, वृद्ध आणि महिला यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस नाईक राकेश चोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT