kolhapur police create video on social distance 
कोल्हापूर

Video -श्वानांना कळतंय मग तुम्हाला का नाही? व्हिडिओ का होतोय प्रचंड व्हायरल?

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - गेल्या तीन महिन्यापासून कोरोनासारख्या महामारीने जगभर थैयमान घातले आहे. आपल्या देशातही त्याने चांगलेच हात-पाय पसरविले आहेत. वेळीच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन पाळण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले तरच कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे. त्यासाठी प्रशासन वेळो-वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु, समाजातील काहींकडून त्याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमिवर कोल्हापूर पोलिसांनी एक भन्नाट व्हिडिओ बनविला आहे. कोल्हापूर पोलिसांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरू प्रचंड व्हायरल होत आहे. 

 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन कोल्हापूर पोलिसांनीही केले आहे. परंतु, रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करून आतापर्यंत पाच हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. तरीही लोक विनाकारण घराबाहेर फिरतच आहेत. त्यावरून पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर पोलिसांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. पोलिस दलातील श्वान सोशल डिस्टन्सिंगचे कसे पालन करत आहेत हे यातून दाखवून दिले आहे. जिल्हा पोलिस दलातील लिना, बेला, स्टेला, ग्लोरी या श्वानांच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना संदेश दिला आहे. आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळू शकतो; आपण का नाही? असा प्रश्न या व्हिडिओतून विचारला आहे. 

पोलिस दलातील हे श्वान आपले खाद्य खातानाही सोशल डिस्टन्सिंगचे कसे पालन करत आहेत. शेवटी, मग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार का? असा प्रश्व विचारत सोशल डिस्टन्सिंग हीच एक युक्ती कोरोनाशी लढण्यास देईल शक्ती असा संदेश या व्हिडिओतून दिला आहे.

दरम्यान, प्रशासनासह कोल्हापूर पोलिस कोरोनाशी दोन हात करत जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. घर-दार परिवार सोडून जिल्ह्यात कडा पहारा देत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला हारवायचेच असा जणू विडाच कोल्हापूर पोलिसंनी उचलला आहे. परंतु, जिल्ह्यातील काही भागात  लोक घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांधीगिरी करत हा व्हिडिओ बनविला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT