kolhapur police raid in three page Gambling 8 people 
कोल्हापूर

कोल्हापूर: तीन पानी जुगार खेळणारे आठ जण पोलिसांच्या ताब्यात

संदीप खांडेकर

कोल्हापूर : कळंबा येथील उन्ने फार्महाऊसच्या रिकाम्या जागेत तीन पानी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २८ हजार ६५० रुपये रोकडसह एक लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी :

कळंबा येथील पावर ग्रीडच्या रस्त्यावर असणाऱ्या उन्ने फार्महाऊसच्या जागेत तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जागेवर जाऊन जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २८ हजार ६५० रोख रक्कमेसह मोबाईल हॅन्डसेट, मोटरसायकल व पत्त्यांची पाने जप्त करण्यात आली.

या प्रकरणी निलेश बाबूराव गवळी (वय ४२, राहणार शिंगणापूर), विश्वास सदाशिव जगताप (४५, कळंबा), रोहन अशोक भोसले (३१, सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत), वैभव विक्रम कुलकर्णी (२६, राजोपाध्येनगर), रणजीत महादेव पाटील (३६, कौलव पैकी बरगेवाडी, ता. राधानगरी), विलास तुकाराम कळंबकर (४९, निठोरी, ता. कागल), हरी परशु साठे (७५, वळीवडे), मारूती शामराव चव्हाण (५५, चिखली), गजानन उन्ने (संपूर्ण नाव माहीत नाही) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.  त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ 'अ'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan Earthquake: जपानमध्ये एक विनाशकारी भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी, हजारो लोकांचे स्थलांतरण, तीव्रता किती?

Dhule Mmunicipal Election : धुळे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर!माजी आमदार फारुक शाह यांचा दावा; "महापौर आमचाच"

Zudio Scam : स्वस्तात मस्त म्हणत मोठी लूट? 'झुडिओ'च्या नावाखाली झाली इतकी मोठी फसवणूक..खरेदीपूर्वी हे एकदा बघाच

१४ महिन्यांच्या लेकराला विष पाजलं, नंतर आईने स्वत:ला संपवलं; सोलापूर हादरलं

Womens World Cup : आंबेगावच्या कन्येमुळे भारत झाला महिला क्रिकेट विश्वचषक विजेता; कणर्धार हरमनप्रीतने दिले मायशा शिंदेला श्रेय

SCROLL FOR NEXT