private travels business sakal
कोल्हापूर

ऐन सणासुदीत खासगी बस प्रवास महागणार

‘आरटीओ’ नोंदणी, नूतनीकरण फीमध्ये आठपट वाढ; आरामबस मालकांचा विरोध

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : परिवहन विभागाकडे जुन्या वाहनांच्या नोंदणी व नूतनीकरण फिटनेससाठी रस्ते महामार्ग मंत्रालयाने आठपट शुल्कवाढीचा अध्यादेश लागू केला. त्यामुळे राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसचालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. या वाढीव शुल्काचा फटका सर्वसामान्य प्रवाशांनाही बसेल. सणासुदीच्या काळात प्रवास महागण्याची टांगती तलवार आहे.

खासगी बसचे वर्षाला नूतनीकरण करावे लागते. गाडीचा फिटनेस परवाना परिवहन विभागाकडून तपासून घ्यावा लागतो. त्यासाठी एक हजार ५०० रुपये शुल्क होते. यात वाढ करून हे शुल्क १२ हजार ५०० रुपये केले आहे. जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर आराम बस आहेत. यात शालेय बसचाही समावेश आहे. प्रत्येक गाडीचा फिटनेस तपासून त्या गाड्या तंदुरुस्त असल्यास वापरता येतात. त्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारी या गाड्यांची तपासणी करून त्यांना नूतनीकरण केल्याचा दाखला देतात. त्यासाठी एक-दोन दिवस गाडी परिवहन कार्यालयाकडे पाठवावी लागते. परिवहन विभागातर्फे थेट सेवा देण्यात येत असली, तरी बहुतांश आराम गाडी मालक-चालक एजंटांची मदत घेऊन कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यात एजंटालाही पैसे द्यावे लागतात. दोन वर्षांत कोरोनामुळे बहुतांश आराम गाड्या बंद होत्या. गाड्या मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. नव्या आदेशामुळे वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे एकूण खर्चात वाढ होईल.

दृष्टिक्षेपात

  • एका आराम बसची किंमत- ५० लाख

  • गाडीचा कर्जाचा हप्ता- १ लाख २५ हजार

  • इंधन खर्च महिन्याला- ३ लाख

  • चालक सहायकाचा पगार- ५० हजार

  • प्रवासी कर- ३० ते ४० हजार

  • गाडी दुरुस्ती खर्च- १ लाख

  • फिटनेस नूतनीकरण खर्च- १२ हजार ५०० रुपये

"अपेक्षित उत्पन्न नसताना जेमतेम महसूल मिळतो. आठपट शुल्क वाढल्याने आराम बसमालकांवर संकट ओढवले आहे. प्रवासी भाडेवाढ करावी लागेल. शुल्कवाढीला आम्ही संघटितपणे विरोध करणार आहेत."

- सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष, खासगी आराम बसमालक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Katraj News : कात्रज घाटात वनविभागाची ‘कुऱ्हाड’; १००० झाडांची कत्तल, तीन एकर परिसर भुईसपाट

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Ambajogai Theft : अंबाजोगाईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पडदाफाश! ५० सीसीटीव्ही चाळले, जिथे वाटा केला तिथल्या तळ्यात कपडे फेकले; अन् एलसीबीच्या जाळ्यात दोघे अडकले

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

SCROLL FOR NEXT