Radhanagari sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरी धरणावर सुशोभीकरणाला गती

पर्यटनमंत्र्यांचा दौरा; पर्यटन विकास योजनेतून तरतूद, १५ मेपर्यंतची डेडलाईन

मोहन नेवडे

राधानगरी : पर्यटनमंत्र्यांच्या राधानगरी दौऱ्यामुळे रखडलेल्या मांजर खिंड आणि राधानगरी धरण चौक (जंक्शन) सुधारणा व सुशोभीकरण कामाने आता गती घेतली आहे. निधीअभावी तब्बल दोन वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. उर्वरित कामासाठी निधीचा प्रस्ताव कागदावरच राहिल्याने काम ठप्पच राहिले, मात्र धरण पायथ्याशी उभारलेल्या राजर्षी शाहू माहिती केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा निश्‍चित झाला. पर्यटनमंत्री कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या राज्य मार्गावरच चौक सुधारणा कामे प्रस्तावित आहेत. यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे अपूर्णावस्थेत राहिलेली कामे पर्यटनमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच म्हणजे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुशोभीकरणाचे काम प्रस्तावित झाले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जवळपास एक कोटीचा निधी मंजूर झाला. पहिल्या टप्प्यात २० लाखांचा निधी उपलब्ध झाला, मात्र ४० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर निधीची कमतरता कायम राहिली. ठेकेदारांनी

काम बंद केले अपूर्णावस्थेत राहिलेले काम पूर्णत्वास जाण्यास पर्यटन मंत्र्यांचा राधानगरी दौरा कामी आला आहे. बाकी कामासाठीचा निधी लवकरच मिळण्याचे संकेत यंत्रणेने दिले आहेत.

पर्यटकांचे आकर्षण

पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या आणि अभयारण्य हद्दीवरील, काळम्मावाडी धरण स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यावरील मांजरखिंड, राधानगरी धरण स्थळाला राज्यमार्गापासून भिडणाऱ्या रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी चौकांची सुधारणा व सुशोभीकरण पर्यटकांचे नवे आकर्षण ठरणार.

‘सकाळ’चा पाठपुरावा

चौक सुशोभीकरणाच्या रेंगाळलेल्या या कामावर ‘सकाळ’ने सातत्याने प्रकाशझोत टाकला. अखेर मंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे याला गती आल्याने रेंगाळलेले हे काम मार्गी लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT