weather update alert Kolhapur  Sakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Alert : घटप्रभेवरील ७ बंधारे पाण्याखाली; बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक बंद

तालुक्यात आज पाचव्या दिवशीसुध्दा पावसाचा जोर कायम राहिला. घटप्रभा नदीवरील सात, तर ताम्रपर्णी नदीवरील पाच बंधारे आज चौथ्या दिवशीही पाण्याखालीच

सकाळ वृत्तसेवा

चंदगड : तालुक्यात आज पाचव्या दिवशीसुध्दा पावसाचा जोर कायम राहिला. घटप्रभा नदीवरील सात, तर ताम्रपर्णी नदीवरील पाच बंधारे आज चौथ्या दिवशीही पाण्याखालीच राहिले. पर्यायी मार्गावरही पाणी आल्यामुळे अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले. येथील अशपाक मकानदार, तर नांदवडे येथील नामदेव गावडे यांच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले.

शनिवारी सकाळी दहानंतर थोडी उसंत घेतली होती. परंतु सायंकाळनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. रात्रभर आणि आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता. ताम्रपर्णी व घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेरुन वाहत होते. घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी, अडकूर, कोनडेवाडी व तारेवाडी तर ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, न्हावेली, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी हे बंधारे आजही पाण्याखालीच राहिले. चंदगड नजीक ताम्रपर्णी पुलावर पाणी आल्यामुळे हेरे, पारगड, तिलारीनगरकडे जाणारी वाहतूक थांबली आहे.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक बंद

बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर कानूर खुर्द ते कानूर बुद्रुक दरम्यान घटप्रभा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने खबरदारी म्हणून आज रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी ही माहिती दिली. आंबोली घाटमाथ्याला लागून असलेल्या या परिसरात गेले आठवडाभर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून, शिवार व्यापून रस्त्यावर आले आहे. सध्या रस्त्यावर सुमारे एक फूट पाणी असल्याचे घोळवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार, जगाला भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल; मोदींचं मोठं स्वप्न!

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT