Three days of pre-monsoon rain in the state 
कोल्हापूर

कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर शहर (Kolhapur city)आणि परिसरात आज दुपारी पावसाला (Rain) सुरुवात झाली. सगळीकडेच अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे . सकाळपासूनच वातावरणात उष्मा प्रचंड होता.मात्र दुपारी दोन नंतर ढगाळ वातावरण झाले त्यानंतर काळ्याकुट्ट ढगांचे साम्राज्य निर्माण झाले आणि पावसाला सुरुवात झाली.kolhapur-rain-update-news

जिल्ह्याच्या बहुतांश भागात ही अशीच स्थिती आहे. आज केरळमध्ये मान्सून (Monsoon in Kerala)दाखल झाला आहे. हा पाऊस येत्या 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गेले दोन-तीन दिवस पाऊस आणि लगेच दाखल होणार मान्सून शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

आजपासून केरळात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज, हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातही मान्सून पूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन (आज, उद्या) दिवस अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्हावासियांना चांगलाच दिलासा दिला. प्रचंड उष्म्यामुळे कासावीस झालेल्या नागरिकांना पावसाचा सुखद गारवा मिळाला. शहर व परिसरात तसेच जिल्ह्याच्या पूर्वभागात चांगला पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT