Panchganga River Water Storage esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain : राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद; महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगेची काय स्थिती?

राधानगरी धरणाचा पाच पैकी एक दरवाजा बंद

सुनील पाटील

राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून 8540 क्यूसेक पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे.

कोल्हापूर : येथील महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी अजूनही 40 फूट 5 इंचावर स्थिर आहे. यातच राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाच पैकी एक दरवाजा बंद झाल्याने दिलासा मिळाला आहे.

राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून 8540 क्यूसेक पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे.

काल धरणातून सुटलेल्या पाण्याच्या पातळीचे विविध बंधाऱ्यावर मोजमाप होत आहे. आज 27 जुलै 2023 सकाळी 8 पर्यंत तारळे बंधारा येते 6 फूट, शिरगाव बंधारा येथे 9 फूट आणि राशिवडे बंधारा येथे 2 फूट 6 इंच पाणी पातळी वाढली आहे.

तर हळदी, कोगे आणि राजाराम बंधारा येथे पाणी पातळी स्थिर आहे. पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे सध्या तरी या पाणी पातळी काही प्रमाणातच वाढ होईल. पण, भीतीदायक वाढ होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT