Kolhapur-Ratnagiri Highway Accident esakal
कोल्हापूर

Highway Accident : जोतिबा दर्शनाला जाणाऱ्या कारच्या धडकेत 20 वर्षाचा तरुण जागीच ठार; 11 जण जखमी

दुचाकीवरील पंकज मोटारीखाली आल्याने जागीच ठार झाला.

सकाळ डिजिटल टीम

मोटारीमध्ये अडकलेल्या जखमींना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले.

प्रयाग चिखली : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (Kolhapur-Ratnagiri Highway) आंबेवाडी येथील रेडेडोहजवळ काल संध्याकाळी भरधाव मोटारीने रिक्षा आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार पंकज भाऊसाहेब जाधव (वय २०, रा. दरेवाडी, ता.पन्हाळा) जागीच ठार झाला.

चारही वाहनांमधील ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प होती. करवीर पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुंदर बिदगर मूळचे नगर जिल्ह्यातील असून, काल ते आपल्या कुटुंबासह जोतिबा दर्शनासाठी मोटारीतून आले होते. यावेळी त्यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने भरधाव मोटार एका दुचाकीला धडकली.

दुचाकीवरील पंकज मोटारीखाली आल्याने जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेला गणेश उडून बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला. याचवेळी बाजूने जाणाऱ्या रिक्षालाही या मोटारीने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा उडून बाजूच्या शेतात पडली. त्यानंतर याच मोटारीने आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

अपघातात मोटारीमधील सुंदर (४०), शांता सुंदर बिदगर (३६), मुलगा गीतेश (१०) आणि कमलाबाई बिदगर (चौघे रा. डिग्रज, ता. संगमनेर) जखमी झाले. रिक्षाचालक मुस्ताक अजीज शेख (५२, रा. मंगळवार पेठ) यांच्यासह रिक्षातील रुचिरा अभिजित आंबोजकर (४०), अभिजित आंबोजकर (४५), आघना अभिजित आंबोजकर (५, तिघे रा. मुंबई) जखमी झाले.

मोटारीने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील मझहर सफीअहमद टिनमेकर (४०), अल्मास मझहर टिनमेकर (३५, दोघे रा. परीट गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर) जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. अपघातातील रुचिरा आणि शांता बिडगर यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सीपीआरमध्ये दाखल केल आहे.

जखमींना बाहेर काढले

मोटारीमध्ये अडकलेल्या जखमींना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. मोटारीखाली सापडलेल्या दुचाकीस्वारांनाही ग्रामस्थांनी बाहेर काढले.

भाच्यासाठी वाढदिवसाला सायकल आणताना अपघात

पन्हाळा : आंबेवाडीतील अपघातात वारकरी सांप्रदायातील भाऊसाहेब कोंडीराम जाधव यांचा वृद्धापकाळातील आधारच हरपला. दरेवाडी (ता.पन्हाळा) येथील भाऊसाहेब जाधव यांना दोन अपत्ये. त्यापैकी मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. अपघातात ठार झालेला पंकज हा बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील सुशिक्षित तरुण. कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन तो नोकरीच्या शोधात होता. तसेच सध्या पेंटिंगचे काम करत होता. पेंटिंगच्या कामातून मिळालेल्या पैशातून तो आज भाच्याला वाढदिवसासाठी भेटवस्तू म्हणून सायकल आणण्यासाठी आत्तेभाऊ गणेश यांच्यासोबत गेला होता; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT