Kolhapur Ratnagiri honored with the Champion Award in Marathi national award marathi news 
कोल्हापूर

 'मॅपाथोन' स्पर्धेत चॅम्पियन अॅवार्डने  कोल्हापूर, रत्नागिरीचा  झाला सन्मान 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी-बी), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) व ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) राष्ट्रीय संस्थांतर्फे आयोजित  'मॅपाथोन' स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर,  अभिजित पाटील, सुधीर पोवार तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मॅपाथोन चॅम्पियन अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. 

स्पर्धेचा निकाल फेब्रुवारीमध्ये जाहीर झाला. स्पर्धेसाठी देशभरातून वेगवेगळ्या संस्थांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेसाठी ५२२८ रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. यातून फक्त २५ स्पर्धकांची राष्ट्रीय मॅपाथोन चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी डॉ. पन्हाळकर व त्यांच्या टीमने फ्लड रिस्क असेसमेंट ऑफ पंचगंगा रिव्हर आणि लॅंडसाईड रिस्क असेसमेंट ऑफ एसडब्ल्यू महाराष्ट्र विषय निवडले. यातून त्यांनी कोल्हापूर व नजीकच्या परिसरातील स्थानिक भौगोलिक समस्या नकाशांमधून सादर केल्या. 

कोल्हापूर शहरानजीक वाहणाऱ्या पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचा रिस्क झोन नकाशा उपग्रहीय माहिती व जीआयएस सॉफ्टवेअरचा वापर करून तयार करण्यात आला. तसेच कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यादरम्यान असणाऱ्या पश्चिम घाटातील घाट रस्त्यांवर होणारे भूस्खलनही नकाशांद्वारे डॉ. पन्हाळकर आणि त्यांच्या टीमने सादर केले.या नकाशांसाठी प्रथमच भूगोल अधिविभागाने बारकोड प्रणालीचा उत्तम प्रकारे वापर केला. 

नकाशावरील बारकोड स्कॅन करताच मॅपमधील माहिती मोबाइलमध्ये असणाऱ्या गुगलमॅपवर दिसेल, अशा प्रकारचे तंत्रज्ञान नकाशामधून सादर केले आहे. याचा वापर या भागातील लोकवस्ती व प्रशासकीय अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी होऊ शकतो. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी या यशाबद्दल डॉ. पन्हाळकर, अभिजित पाटील, सुधीर पोवार  व संजय शिंदे यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, मॅपाथोन विशिष्ट स्थानबद्ध समस्येवर उपाय योजनेसाठी घेण्यात आलेली राष्ट्रीय स्थरावरील मॅपिंग स्पर्धा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने संशोधनाकरिता भारतीय उपग्रहांनी घेतलेली माहिती, भुवन, एनआरएससी प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिलेली आहे. माहितीत भारतीय संसाधने, शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण व शहरी नियोजन आणि भविष्यातील विकासाचे मार्ग ओळखण्याची प्रचंड क्षमता आहे. आत्मनिर्भर भारत  राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्पर्धेसाठी फक्त भारतीय उपग्रहीय व अनुषंगिक माहितीचा वापर करणे अनिवार्य होते. भारतीय रिमोट सेन्सिंग डेटाची क्षमता समजून घेणे आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करून भारतीय विभागांसाठी अत्याधुनिक नकाशे तयार करणे, स्पर्धेचे मुख्य उदिष्ट होते.  


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT