kolhapur Rice bran biofuel from sugarcane chips 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या सुपुत्राचे संशोधन; भाताचा कोंडा, ऊसाच्या चिपाडापासून जैव इंधन 

नंदिनी नरेवाडी -पाटोळे

कोल्हापूर - सध्या उपलब्ध असणारी इंधने भविष्यात संपुष्टात येऊ शकतात. त्यासाठी पर्यायी इंधन उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. याबाबत जगभरात संशोधने केली जात आहेत. यात कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील एक तरुण आघाडीवर आहे. भाताचा कोंडा व उसाच्या चिपाडापासून बायोमिथेन, बायोइथेनॉल आणि बायोडिझेलची निर्मिती त्यांनी केली असून त्यांच्या या संशोधनामुळे भविष्यात इंधनाला जैविक पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच हे इंधन कमी खर्चात तयार करता येणार असून पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. यामध्ये संशोधन करणाऱ्याचे नाव आहे डॉ. सचिन विजय ओतारी.

डॉ. सचिन ओतारी यांचे पदवीचे शिक्षण राजाराम महाविद्यालयातून सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातून झाले. पुढे शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात त्यांनी ‘बायोलॉजिकल सिथेंसिस ऑफ सिल्वर नॅनो पार्टिकल फॉर बायोमेडिकल ॲपलिकेशन’ या विषयावर पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर त्यांना साऊथ कोरियातील काँकुक विद्यापीठात ब्रेनपुल फेलोशिप मिळाली. या फेलोशिपच्या माध्यमातून बायोइंधन निर्मितीबाबत संशोधन करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी रिसर्च असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले. या विषयावर त्यांचे ४३ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. नुकतेच त्यांना महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेकडून यंग असोसिएटस म्हणून नामांकनही मिळाले होते. तसेच राष्ट्रीय स्तरावरील असोसिएशन ऑफ मायक्रोबायॉलॉजी या संस्थेकडून डॉ. जे. एस. भाट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना ३ कोरियन पेटंटही मिळाली आहेत.


हायड्रोजलची निर्मिती 
साऊथ कोरियामधून परत आल्यानंतर डॉ. ओतारी यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची डॉ. डी. एस. कोठारी पोस्ट डॉक्‍टरल फेलोशीप मिळाली. सध्या ते शिवाजी विद्यापीठात हळदीतील करकुमीन या घटकांपासून काळ्या पडणाऱ्या त्वचेवर परिणामकारक अशा नॅनो पार्टिकल बेस्ड हायड्रोजलची निर्मिती करत आहेत.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT