kolhapur right dudhganga canal gawa 
कोल्हापूर

Video -कोल्हापूरच्या दूधगंगा उजव्या कालव्यात पडले गवे 

सकाळ वृत्तसेवा

सरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी पिण्यासाठी उतरलेला गव्यांचा कळप पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. कालव्याला प्लास्टर असल्याने गव्यांना वरती चढता येईना. त्यामुळे पाण्यातून सुमारे अर्धा किलोमीटर वाहत गेले. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. 

आज सकाळी आठ –दहा गव्यांचा कळप उजव्या कालव्याच्या 17 किलोमीटरमध्ये पाणी पिण्यासाठी उतरला. कालव्यात साडेचारशे क्युसेस पाणी सोडले आहे. पाण्याला अधिक वेग असल्याने सरवडेच्या हद्दीत उतरलेले गवे सुमारे अर्धा किलोमीटर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. कालव्याला प्लास्टर असल्याने गव्यांना वर चढता येईना. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहत उंदरवाडी व सरवडे दरम्यान अठराव्या किलोमीटर मध्ये कालव्यावर पूल बांधण्यासाठी सोडलेल्या जागेपर्यंत आले. त्याठिकाणी प्लास्टर नसल्याने गव्यांना वर चढण्यासाठी जागा मिळाली. त्याठिकाणाहून गवे वर चढून जंगलाकडे गेले. कालव्यावर फिरावयास गेलेल्या उंदरवाडीच्या तरुणांनी गवे वाहत जाताना पाहिले, त्यांना हुसकावून गवे वर निघण्याचा प्रयत्न केला. परंतु प्लास्टरमुळे गव्यांना वर चढता येत नव्हते.

व्हिडिओ पाहा - 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT