School girl suicide sakal
कोल्हापूर

Kolhapur : खाऊला पैसे न दिल्याने शाळकरी मुलीने उचलले टोकाचे पाऊल

‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू; प्रकृती सुस्थितीत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : खाऊला पैसे न दिल्याने शाळकरी मुलीने कीटकनाशक प्याल्याची धक्कादायक घटना आज करवीर तालुक्यात घडली आहे. तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती सुस्थितीत आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

पोलिसांनी आणि मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे वडील बांधकाम कामगार आहेत. ते सकाळी लवकर कामावर गेले होते. त्यांच्या घरी चार मुली आणि एक मुलगा आहे. ही मुलगी आठवीमध्ये शिकते. आज सकाळी वडील घरातून लवकर कामावर गेल्याने मुलीने आईकडे खाऊसाठी पैसे मागितले. मात्र, आई शेतात भांगलण करण्यासाठी जाण्याच्या घाईत होती.

नंतर पैसे देते असे सांगून ती निघून गेली. त्यावेळी घरी मोठे कोणीही नव्हते. तेव्हा घरातच असलेले कीटकनाशक ती प्यायली. तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती आईला आणि नातेवाइकांना मिळताच त्यांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. सकाळी घडलेल्या घटनेनंतर तिला वेळीच सीपीआरमध्ये दाखल केले. तातडीने उपचार सुरू झाल्यामुळे तिची प्रकृती सध्या सुस्थितीत असल्याचे तिच्या मामेभावाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT