black rise sakal media
कोल्हापूर

Kolhapur : शाहूवाडीच्या मातीत पिकली ‘काळ्या भाताची शेती’

शिंदेवाडीतील शेतकऱ्याचा प्रयोग; रासायनिक खताला फाटा देत केवळ शेणखताचा वापर

डी. आर. पाटील

सरूड : सोनवडे पैकी शिंदेवाडी (ता. शाहूवाडी) येथील प्रयोगशील शेतकरी गुरुनाथ शिंदे यांनी आरोग्यपूर्ण ‘चाकहो’ काळ्या भाताच्‍या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. इतर वाणाप्रमाणेच या भाताचे काड हिरवे असले तरी भातकुंडा (दाणे) आणि आतील तांदळाचा रंग हा काळा आहे.

शिंदे यांनी स्वतःच्या २० गुंठे क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेले हे भात सध्‍या काढणीला आले आहे. रोग प्रतीकारक क्षमता सिद्ध तसेच कोणत्याही प्रकारचा संकर नसलेले हे बियाणे वाण असून शेतात रासायनिक खतांच्या वापराशिवाय केवळ शेणखताचा (कंपोस्ट) वापर करून शिंदे यांनी कल्पकतेने हे भात पिकविले आहे.

शिंदे म्हणाले, ‘‘हा तांदूळ उकडून घेतल्यानंतरही त्याचा काळा रंग बदलत नाही. पंजाब व मणिपूर राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेतात. चीन व म्यानमार हे ‘चाकहो’चे उगमस्थान आहे. स्वतः २० गुंठे क्षेत्रात काळ्या भाताची लागवड करण्याचा निर्णय घेऊन आसाम राज्यातील व्यावसायिक शेतकरी गटाकडून ७ किलो बियाणे मागवून घेतले. दरम्यान, तांबेरा (करपा) रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून केलेली प्रतिबंधक औषध फवारणी वगळता रासायनिक खतांचा वापर कटाक्षाने टाळला त्यांनी सांगितले.

विविध रोगावर औषधी गुणधर्म

खाण्यास चविष्ट असणाऱ्या या भाताच्या संशोधनातील निष्कर्ष पाहता मधुमेह, कर्करोग, बद्धकोष्ठता याशिवाय वंध्‍यत्व निवारक औषधी गुणधर्म आढळून आले आहेत.

"गतवर्षी सकाळच्या ‘अॅग्रोवन’ या दैनिकात या विषयी लेख आला होता. यापुढे काळा गहू पिकविण्याचा मानस आहे. साधारणपणे भाताचे १० ते १२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. दैनंदिन वापर वगळता उर्वरित भात बियाणे म्हणून विक्री करणार असल्याचे शिंदे यांनी शेवटी स्पष्ट केले."

- गुरुनाथ शिंदे, शेतकरी, शिंदेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Movement : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या निषेर्धात आंदोलन; वॉशिंग्टनपासून लंडनपर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले

Pune Fraud: 'ज्येष्ठ नागरिकाची दीड कोटीची फसवणूक'; पहलगाम हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या नावाने दाखवली भिती अन्..

Deputy CM Eknath Shinde : 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ‘पोटदुखी’ होणाऱ्यांना टोला, नेमकं काय म्हणाले?

E-Vehicle: 'ई-वाहन' खरेदीदारांना सीएम योगींची मोठी भेट; नोंदणी आणि रोड टॅक्समध्ये दोन वर्षांची वाढीव सूट!

Trupti Desai: सासपडेतील संशयिताचा एन्काउंटर करा: तृप्ती देसाई; पीडित कुटुंबीयांचे सांत्वन, कायद्याचा धाक उरलेला नाही

SCROLL FOR NEXT